मंडणगड तालुक्यात मिंधे गटाला धक्क्यावर धक्के बसत आहेत. शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षात मोठ्या संख्येने गावेच्या गावे जाहीर पक्ष प्रवेश करू लागल्याने मिंधे गटाला उतरती कळा लागली आहे. जिल्हा प्रमुख संजय कदम यांच्या कणखर नेतृत्वाखाली शिवसेना पक्ष संघटन अधिक मजबूत स्थितित उभारी घेत आहे. त्यामुळे निवडणूकी आधीच विधानसभा निवडणुकीच्या निकालाचा कल हा शिवसेनेच्या बाजूने लागणार हे जवळ पास स्पष्ट झाले आहे. उमरोली ग्राम पंचायतीचे माजी सरपंच आणि शिपोळे गावठणचे अध्यक्ष काशिनाथ शिंदे तसेच जितेंद्र जगताप आदी प्रमुख पदाधिका-यांच्यासह शिपोळे गावठणचा मिंधे गटातून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात जिल्हा प्रमुख संजय कदम यांच्या उपस्थितीत जाहीर पक्ष प्रवेश होवून मंडणगडात मिंधे गटाला मोठे भगदाड पडल्याने मिंधेची चांगलीच तंतरली आहे.
मंडणगड तालुक्यातील शिपोळे गावठाणने मिंधे गटाची साथ संगत सोडून उमरोली ग्राम पंचायतीच्या माजी सरपंच आणि शिपोळे गावठणचे अध्यक्ष काशिनाथ शिंदे त्याचप्रमाणे जितेंद्र जगतात आदी प्रमुख पदाधिकाऱ्यांसह शिपोळे गावठाणातील भाऊ जगताप,सिध्देश शिंदे,अजय जगताप,प्रदीप घोसाळकर, महेश जगताप,विलास पवार,सुनिल जगताप,संतोष भागणे,लक्ष्मण साळवी,अनंत मालप, प्रभाकर पवार, शांताराम मोरे,भाऊ मालप,वसंत भांगणे,भिकाजी भांगणे,सचिन साळवी, शांताराम मोरे,कल्पना खैरे,भारती मालप,स्वाती साळवी,कला शेलार आदींसह शिपोळे गावठाणने हसरत खोपटकर यांच्या प्रयत्नाने शिवसेना जिल्हाप्रमुख संजय कदम यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे )पक्षामध्ये जाहीर पक्ष प्रवेश केला. यावेळी शिपोळे गावठणचे शाखाप्रमुख म्हणून जितेंद्र जगताप यांची नियुक्ती करण्यात आली तसे नियुक्तीचे पत्रही जितेंद्र जगताप यांना देण्यात आले.
या पक्ष प्रवेशाच्या कार्यक्रमाला रत्नागिरी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष आणि मंडणगड तालुका शिवसेनेचे तालुका प्रमुख संतोष गोवळे, युवासेना उप जिल्हाधिकारी गणेश बिल्लार , उमरोली ग्राम पंचायतीचे माजी सरपंच दीपक बोर्ले, देव्हारे शाखा प्रमुख रामचंद्र फराटे, खेड तालुका सुकिवली ग्रामपंचायत सदस्य परेश जाधव, स्वप्नील पाटील,मंदार शिर्के, उप तालुका अधिकारी उमेश घागरुम,युवासेना विभाग प्रमुख सिध्देश शिंदे आदींसह उमरोली विभागातील सर्व शाखा प्रमुख,उप शाखा प्रमुख,महीला संघटीका तसेच शिवसैनिक युवासैनिक आजी माजी पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्ते ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.