भारतीय जनता पार्टीचे नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघाचे नेते बाळासाहेब बोकारे यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षामध्ये शुक्रवारी जाहीर प्रवेश केला. सदरील प्रवेश शिवेसना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये मातोश्रीत मुंबई येथे संपन्न झाला.
यावेळी नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघाचे जिल्हाप्रमुख माधव पावडे व इतर सर्व जिल्हाप्रमुख यावेळी उपस्थित होते. सदरील प्रवेशामुळे भारतीय जनता पार्टीला उत्तर विधानसभेत मोठे खिंडार पडले असून, आगामी निवडणुकीमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाला या माध्यमातून मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे. शुक्रवारी मातोश्री मुंबई येथे शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्या हस्ते व जिल्हाप्रमुख माधव पावडे यांच्या नेतृत्वाखाली नांदेड उत्तर मतदारसंघातील लिंबगाव माजी जिल्हा परिषद सदस्य साहेबराव धनगे, मनसेचे गणेशराव कदम, मार्केट कमिटीचे संचालक बालासाहेब बोकारे, संजय पावडे, भीमराव पाटील कल्याणकर, तानाजी पाटील, कैलास कदम यांनी शिवसेनेत पक्षप्रवेश केला. यावेळी जिल्हाप्रमुख प्रमोद उर्फ बंडू खेडकर, बबन बारसे, सहसंपर्कप्रमुख दत्ता पाटील कोकाटे, जिल्हा संघटक नेताजी भोसले, बालाजी शिंदे, महानगरप्रमुख प्रदीप उर्फ पप्पू जाधव आदींची उपस्थिती होती.