विधानसभा निवडणुकीच्या कामासाठी राज्य सरकारच्या सर्व विभागांतील अधिकारी, कर्मचाऱयांना नेमणुका दिल्या जाणार आहेत. मात्र, यावेळी आरोग्य विभागातील प्राथमिक आरोग्य पेंद्र, उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालयातील अत्यावश्यक सेवेतील डॉक्टरांना या सेवेतून वगळण्यात आले आहे. मात्र, आरोग्य खात्यातील अन्य अधिकारी, कर्मचारी यांना निवडणुकीसाठी नेमणूक दिली जाईल.
यंदाच्या विधानसभा निवडणुकीसाठी जिल्हा प्रशासनाने कर्मचाऱयांना नेमणुका देण्यासंदर्भात आराखडा तयार केला आहे. जिह्यातील मतदानासह मतमोजणीसाठी 21 मतदारसंघांत सुमारे 51,646 कर्मचाऱयांची कुमक तयार करण्यात आली आहे. त्यांच्या जोडीला अतिरिक्त दहा हजार अशा सुमारे 62 हजार कर्मचाऱयांची फौज जिल्हा प्रशासनाने निवडणुकीसाठी तयार केली असून, लवकरच त्यांना नेमणुका आणि प्रशिक्षणाचे आदेश दिले जाणार आहेत.
जिह्यात 21 विधानसभा मतदारसंघांमध्ये निवडणुकीसाठी आठ हजार 417 मतदान पेंद्रे आहेत. निवडणूक प्रशासनाने मतदान पेंद्राध्यक्ष, शिपाई; तसेच सहायक मतदान पेंद्राध्यक्ष, कर्मचाऱयांच्या नियुक्तीचे आदेश काढले आहेत. त्यानुसार 43 हजार 768 अधिकारी, कर्मचाऱयांची नियुक्ती करण्यात आली असली तरी सध्या जिल्हा प्रशासनाकडे 51 हजार 646 इतके कर्मचारी उपलब्ध आहेत; तसेच अन्य मतदान प्रक्रियेसाठी सुमारे 10 हजार अतिरिक्त कर्मचारी असे सुमारे 62 हजार कर्मचारी, अधिकाऱयांच्या नियुक्तीचे आदेश जिल्हा प्रशासनाने काढले आहेत.
निवडणूक कामासाठी प्रामुख्याने राज्य, पेंद्र सरकारचे अधिकारी, कर्मचाऱयांचा समावेश आहे. त्याशिवाय खासगी, सरकारी शाळा, बँका, सरकारचे अन्य विभागांतील अधिकारी, कर्मचाऱयांना निवडणुकीच्या कामात सहभागी करून घेतले जाणार आहे. नेमणुकीनंतर त्यांच्या प्रशिक्षणाचा टप्पा निश्चित केला जाईल.