बाबा सिद्दिकी हत्येप्रकरणी आणखी पाचजणांना अटक, हत्येचे धागेदोरे डोंबिवली-अंबरनाथपर्यंत 

माजी मंत्री बाबा सिद्दिकी यांच्या हत्येप्रकरणी मुंबई गुन्हे शाखेच्या पोलिसांनी आणखी पाचजणांना अटक केली. नितीन स्प्रे, संभाजी पारधी, राम कनोजिया, प्रदीप ठोंबरे आणि चेतन पारधी अशी त्यांची नावे आहेत. त्या पाचजणांच्या अटकेने अटक आरोपींची संख्या नऊ झाली आहे. अटक आरोपींनी शूटरना शस्त्रs पुरवणे आणि राहण्याची व्यवस्था करून दिल्याचे तपासात समोर आले आहे.

माजी मंत्री बाबा सिद्दिकी यांची गोळीबार करून हत्या करण्यात आली होती. हत्येप्रकरणी गुन्हे शाखेने तपास करून चौघांना अटक केली होती. त्या चौघांच्या चौकशीत पोलिसांना महत्त्वपूर्ण माहिती मिळाली. त्या माहितीच्या आधारे पोलिसांनी कर्जत, अंबरनाथ आणि डोंबिवली येथे सापळा रचला. नितीनला डोंबिवली, संभाजी, प्रदीप आणि चेतनला अंबरनाथ, तर रामला पनवेल येथून ताब्यात घेऊन आज अटक केली. सिद्दिकी यांच्यावर गोळीबार करण्यासाठी नितीन आणि रामने शूटरना परदेशी बनावटीची शस्त्रs पुरवली होती, तर संभाजी, प्रदीप आणि चेतन यांनी शूटरना राहण्याची आणि वाहनांची व्यवस्था करून दिली होती. हत्या प्रकरणात नितीन आणि राम हे महत्त्वाचे आरोपी आहेत. त्या पाचजणांना अटक करून आज उशिरा न्यायालयात हजर केले होते. अटक केलेले ते पाचजण पह्नच्या माध्यमातून बिष्णोई टोळीच्या संपका&त असल्याचे पोलिसांनी न्यायालयात सांगितले.  गोळीबारप्रकरणी पोलिसांनी शूटरला अटक केली आहे. एक शूटर हा फरार आहे. आरोपीच्या वकिलांनी न्यायालयात युक्तिवाद केला. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने त्या पाचजणांना 25 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.