जगप्रसिद्ध इंग्लिश पॉप बँड वन डायरेक्शनचा माजी सदस्य गायक लियाम पायने याचा मृत्यू झाला आहे. गायक ब्यूनस आयर्समधील एका हॉटेलमध्ये थांबला होता जेथे तो अचानक तिसऱ्या मजल्यावरील खिडकीतून पडला. सध्या या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. त्याच्या पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये अनेक धक्कादायक खुलासे झाले आहेत.
न्यूज 18 मधील वृत्तानुसार, तिसऱ्या मजल्यावरुन पडल्यानंतर पायने बेशुद्ध झाला होता आणि त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. रक्तस्त्राव जास्त झाल्याने त्याला वाचवता आले नाही. ब्यूनस आयर्स पब्लिक प्रोसिक्युटर ऑफिसने तपास केला असता त्याचा संशयास्पद मृत्यू मानले जात आहे. अधिकाऱ्यांना संशय आहे की पायने याने पडण्यापूर्वी त्याने जास्त प्रमाणात ड्रग्स किंवा अल्कोहोलचे सेवन केले होते, ज्यामुळे त्याचा मृत्यू झाला. पोलीस तज्ज्ञांना पायनेच्या हॉटेलच्या खोलीत ड्रग्ज, अल्कोहोल आणि तुटलेले फर्निचर सापडले, ज्यामुळे तो चिंता आणखी वाढली. पायनेच्या दुखापतींवरून असे दिसून येते की, ज्यावेळी तो पडला त्यावेळी तो शुद्धीत नव्हता.
त्यादिवशी पायनेच्या खोलीत उपस्थित असलेले तीन कर्मचारी, दोन महिलांसह इतर साक्षीदारांचे जबाब नोंदवण्यात आला आहे. हे लोक घटनेच्या काही वेळापूर्वी पायनेच्या खोलीत गेले होते आणि पायनेचे वागणे थोडे विचित्र असल्याचे सांगितले होते. पायनेच्या मृत्यूच्या काही वेळापूर्वी हॉटेल कर्मचारी चिंतित झाले होते आणि गायकाच्या विचित्र वागणुकीमुळे त्यांनी 911 वर कॉल केला होता. पायने कसा पडला आणि आजूबाजूला घडलेल्या घटनाक्रमाचा तपास तपासकर्ते कसून करत आहेत. यात तिसऱ्या व्यक्तीचा हात आहे का, याचाही शोध घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र, अपघाताच्या वेळी पायने खोलीत एकटाच होता.