शेख हसीना यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी, कोर्टात हजर राहण्याचे आदेश

बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्या अडचणीत वाढ झाली असून बांगलादेशातील कोर्टाने त्यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी केले आहे. 18 नोव्हेंबरपर्यंत त्यांना कोर्टात हजर राहाण्याचे आदेश देण्यात आले आहेत. बांगलादेशच्या आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायाधिकरणाचे मुख्य अभियोक्ता मोहम्मद ताजुल इस्लाम यांनी माहिती दिली.

शेख हसीना यांच्याविरोधात मानवाधिकार उल्लंघनाशी संबंधित अनेक प्रकरणांची चौकशी सुरू आहे. विद्यार्थी आंदोलनात प्राण गमावलेल्या अनेक विद्यार्थ्यांची हत्या केल्याचाही त्यांच्यावर आरोप आहे. याप्रकरणी आता हसीना यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. हसीना यांच्या प्रत्यार्पणाची अनेकदा मागणी करण्यात आली आहे. याप्रकरणी हिंदुस्थानलाही राजनैतिक संकटाचा सामना करावा लागला आहे.