आसामच्या दीमा हसाओ जिल्ह्यात डिबालोंग स्टेशनवर आगरताळा-लोकमान्य टिळक एक्सप्रेसचा अपघात झाला आहे. आगरताळा-लोकमान्य टिळक एक्सप्रेसचे आठ डबे रुळावरून घसरले आहेत. यात कुठलीही जीवितहानी झाली नसल्याचे रेल्वे प्रशासनाने म्हटले आहे. आज संध्याकाळी चारच्या सुमारास हा अपघात झाला आहे. पण याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. रुळावरून जे डबे घसरले आहेत त्यात पॉवर कार आणि इंजिनचाही समावेश आहे.
प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार बचाव कार्यासाठी वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. लुमडिंग-बदरपूर मार्गावर ट्रेनची वाहतूक बंद करण्यात आली आहे.
“8 coaches of Train 12520 Agartala –LTT Express derailed at Dibalong station near Lumding at 15:55 Hrs today. There has been no major casualty or injury and all passengers are safe,” says Assam CM Himanta Biswa Sarma pic.twitter.com/tp3j3QULTJ
— ANI (@ANI) October 17, 2024