रेल्वे तिकीट रिझर्व्हेशनच्या नियमांमध्ये मोठा बदल, आता 60 दिवस आधी बुकिंग करता येणार

रेल्वे तिकीट रिझर्व्हेशनच्या नियमांमध्ये मोठा बदल करण्यात आला आहे. नवीन नियमांनुसार आता 60 दिवस आधी तिकीट रिझर्व्ह करता येणार आहे. पूर्वी हा कालावधी 120 दिवसांचा होता. नवीन नियम 1 नोव्हेंबर 2024 पासून लागू होणार आहे.

रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, 1 नोव्हेंबर 2024 पासून तिकीट रिझर्व्ह करण्यासाठी 60 दिवस आगोदर (प्रवासाचा दिवस सोडून) जागा आरक्षित करावी लागणार आहे. जुना 120 दिवसांचा नियम 31 ऑक्टोबर 2024 पर्यंत कायम राहणार आहे. त्यामध्ये कोणताही बदल होणार नाही. त्याचबरोबर 60 दिवसांच्या कालवधीत रिझर्व्ह केलेली तिकीट रद्द करण्याची परवानगी देण्यात आली आहे. मात्र, परदेशी पर्यटकांच्या नियमामध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. म्हणजेच त्यांचा 365 दिवसांचा कालावधी कायम असणार आहे.