Maharashtra election 2024 – 71 लाख 50 हजार मतदार ठरवणार 18 ‘ठाणेदार’

20 नोव्हेंबर 2024 रोजी होत असलेल्या विधानसभा निवडणुकीत ठाणे जिल्ह्यातील 71 लाख 55 हजार 728 मतदार 18 ठाणेदार ठरवणार आहेत. जिल्ह्यातील 18 विधानसभा मतदारसंघात निवडणूक घेण्यासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज झाली आहे. जिल्ह्यात सर्वाधिक मतदार ओवळा-माजिवडा मतदारसंघात 5 लाख 40 हजार 293 इतके आहेत, तर सर्वात कमी 2 लाख 80 हजार 852 मतदारांची नोंदणी उल्हासनगर मतदारसंघात झाली आहे. विधानसभा निवडणुकीची घोषणा निवडणूक आयोगाने मंगळवारी केल्यानंतर ठाणे जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी अशोक शिनगारे यांनी आज विधानसभानिहाय निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या नियुक्तीची घोषणा केली. जिल्ह्यातील सर्वच विधानसभा मतदारसंघात 6 ठाणे हजार 894 मतदान केंद्रांवर मतदान होणार आहे. सर्वाधिक मतदान केंद्र मुरबाडमध्ये 518 तर सर्वात कमी मतदान केंद्र उल्हासनगरमध्ये 260 आहेत.

ठाणे जिल्ह्यात भिवंडी ग्रामीण, शहापूर, भिवंडी पश्चिम, भिवंडी पूर्व, कल्याण पश्चिम, मुरबाड, अंबरनाथ, उल्हासनगर, कल्याण पूर्व, डोंबिवली, कल्याण ग्रामीण, मीरा-भाईंदर, ओवळा-माजिवडा, कोपरी-पाचपाखाडी, ठाणे शहर, मुंब्रा कळवा, ऐरोली आणि बेलापूर या 18 विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे. या सर्वच मतदारसंघात पुरुष मतदारांची संख्या 38 लाख 13 हजार 264 तर महिला मतदारांची संख्या 33 लाख 41 हजार 70 इतकी आहे. निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी निवडणूक आयोगाने २० जिल्हास्तरीय समन्वय अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. निवडणुकीच्या प्रचारादरम्यान आचारसंहितेचा भंग होणार नाही यासाठी प्रत्येक विधानसभा मतदारसंघात नऊ पथके तयार करण्यात आली आहेत, अशी माहिती जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी अशोक शिनगारे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

जिल्ह्यात अवघी 13 हजार दुबार नोंदणी-

ठाणे जिल्ह्यातील ठाणे, मीरा-भाईंदर, ओवळा-माजिवडा, कोपरी-पाचपाखाडी, बेलापूर, ऐरोली आणि कळवा-मुंब्रा या विधानसभा मतदारसंघामध्ये 2 लाख 17 हजारांच्या आसपास दुबार मतदार असल्याच्या तक्रारी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाकडून करण्यात आल्या होत्या, परंतु संपूर्ण ठाणे जिल्ह्यात केवळ 13 हजारच दुबार मतदार असल्याचा दावा जिल्हा प्रशासनाने आज केला असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

Maharashtra election 2024 – भाजपचा हरयाणा पॅटर्न पुण्यात राबवणार; तापकीर, मिसाळ यांची धाकधूक वाढली

निवडणूक निर्णय अधिकारी 

भिवंडी ग्रामीण मल्लिकार्जुन माने, शहापूर – राहुल मुंडके, भिवंडी पश्चिम – उदय किसवे, भिवंडी पूर्व अमित सानप, कल्याण पश्चिम रोहितकुमार राजपूत, मुरबाड – अंजली पवार, अंबरनाथ – प्रशांत जोशी, उल्हासनगर विजयानंद शर्मा, कल्याण पूर्व – रमेश मिसाळ, डोंबिवली – अमित शेडगे, कल्याण ग्रामीण – विश्वास गुजर, मीरा- भाईंदर – सुनील भुताळे, ओवळा- माजिवडा – इब्राहिम चौधरी, कोपरी- पाचपाखाडी – सर्जेराव मस्के पाटील, ठाणे उर्मिला पाटील, ऐरोली – सुचिता भिकाणे, बेलापूर – अश्विनी सुर्वे.

मतदारांची आकडेवारी

मतदारसंघ       मतदारांची संख्या
भिवंडी ग्रामीण – 335329
शहापूर – 288757
भिवंडी पश्चिम – 332290
कल्याण पूर्व – 324659
डोंबिवली – 303822
कल्याण ग्रामीण – 502445
मीरा-भाईंदर – 507452
ओवळा-माजिवडा – 540293
कोपरी-पाचपाखाडी – 338320
ठाणे शहर – 374153
मुंब्रा-कळवा – 485154
ऐरोली – 484407
बेलापूर – 420242
भिवंडी पूर्व – 369589
कल्याण पश्चिम – 434928
मुरबाड – 464983
अंबरनाथ – 371053
उल्हासनगर – 280852

नियंत्रण कक्ष 24 तास कार्यरत

निवडणुकीत काही गैरप्रकार घडला आणि आचारसंहिता भंग झाला तर नागरिकांना नियंत्रण कक्षाशी संपर्क साधता येणार आहे. प्रत्येक विधानसभा मतदारसंघात नियंत्रण निवडणुकीत काही गैरप्रकार घडला आणि आचारसंहितेचा भंग झाला तर नागरिकांना नियंत्रण कक्षाशी कक्ष स्थापन करण्यात आला आहे. हा नियंत्रण कक्ष 24 तास सुरू राहणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातही 83723388827 आणि 18008911350 हे क्रमांक नागरिकांसाठी उपलब्ध करून देण्यात आले आहेत, असेही जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी अशोक शिनगारे यांनी यावेळी स्पष्ट केले.

विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यातील 18 मतदारसंघात 33 लाख 41 हजार 70 महिला मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. महिला मतदारांचे प्रमाण सर्वात कमी भिवंडी पूर्व मतदारसंघात आहे. या मतदारसंघात एक हजार पुरुष मतदारांच्या मागे महिला मतदारांची संख्या 731 आहे. सर्वाधिक महिला मतदारांचे प्रमाण शहापूर मतदारसंघात आहे.