चंद्राबाबू तळीरामांवर मेहरबान; अवघ्या 99 रुपयांत ब्रॅण्डेड दारू

सत्तेत आलो तर वाजवी दरात उत्तम दर्जाची दारू देऊ असे आश्वासन विधानसभा निवडणुकीत देणारे आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू हे तळीरामांवर प्रचंड मेहरबान असल्याचे उघड झाले आहे. त्यांनी आंध्र प्रदेशमध्ये कुठल्याही ब्रॅण्डची दारू केवळ 99 रुपयात देण्याची घोषणा केली आहे.

चंद्राबाबूंनी नवीन मद्य धोरण आखले आहे. त्यानुसार पुठल्याही व्यक्तीला लॉटरीतून दारू पिण्याचा परवाना मिळणार आहे. दारूची दुकाने आधी सरकारी होती. आता ती खासगी असणार आहेत. या पार्श्वभूमीवर 113 दारूच्या दुकानांसाठी तब्बल 5 हजार 825 अर्ज आल्याची माहिती एनटीआर जिह्याचे न्यायदंडाधिकारी डी.जी. श्रीजना यांनी दिली आहे. या नवीन मद्यधोरणानुसार आंध्र प्रदेशात पुठल्याही ब्रॅण्डची 180 एमएल दारूची बाटली केवळ 99 रुपयांता मिळणार आहे. दारूचा दर्जा, प्रमाण आणि ग्राहकांना दारू परवडावी यासाठी नवीन मद्यधोरण तयार करण्यात आल्याचे सरकारने म्हटले आहे. लॉटरी सिस्टममधून अर्जदारांना दारू विक्रीचा परवाना दोन वर्षांसाठी मिळणार आहे.

ईडी प्रकरणात मोदींनी क्लीन चिट दिल्याचा आनंद

चंद्राबाबू नायडू यांच्या घोषणेनंतर नेटकऱयांनी त्यांना अक्षरशः झोडून काढले. खरा नेता तोच असतो जो त्याला झालेला आनंद स्वतः साजरा करत नाही. त्या आनंदात सर्वांना सहभागी करून घेतो. आज चंद्राबाबू नायडू यांना मोदींनी ईडीच्या एका प्रकरणात क्लीन चिट दिली. त्यानंतर चंद्राबाबूंनी संपूर्ण आंध्र प्रदेशात आनंदोत्सव साजरा केला. कुठल्याही ब्रॅण्डची दारू केवळ 99 रुपयात देण्याची घोषणा केली, अशा शब्दांत नेटकऱयांनी टीका केली आहे.

 n दारू विकण्याच्या परवान्यासाठी अर्ज करताना अर्जदारांना दोन लाख रुपये शुल्क भरावे लागणार आहे. हे शुल्क परत मिळणार नाही. सर्व दारूच्या दुकानांपैकी 10 टक्के दुकाने ही ताडीविक्रीसाठी आरक्षित ठेवली जाणार आहेत.

n सकाळी 10 ते रात्री 10 दरम्यान ग्राहकांना दारू विकता येईल. परवान्यासाठी चार स्लॅब तयार करण्यात आले आहेत. 50 लाख ते 85 लाख रुपयांपर्यंत हे स्लॅब असणार आहेत.