खूशखबर! केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 3 टक्के वाढ

केंद्र सरकारने कर्मचाऱयांना दिवाळी भेट दिली आहे. आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत केंद्रीय कर्मचाऱयांच्या डीएत म्हणजेच महागाई भत्त्यात 3 टक्क्यांची वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला. महागाई भत्त्यात करण्यात आलेली ही वाढ 1 जुलै 2024 पासूनच लागू असणार आहे. म्हणजेच थकबाकीसह हा महागाई भत्ता दिला जाणार असून याचा लाभ पेन्शनधारकांनाही मिळणार आहे.

महागाई भत्ता 50 टक्क्यांवरून 52 टक्के होणार आहे. याची अंमलबजावणी जुलैपासून होणार आहे. म्हणजेच जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर या महिन्यांची थकबाकीही कर्मचाऱयांना मिळणार आहे.