
प्रत्येक राज्यातली संपत्ती लुटून गुजरातला पाठवली जात आहे असा आरोप काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. तसेच राज्य सरकारला महाराष्ट्रातले कंत्राटदार मिळत नाही का असेही वडेट्टीवार म्हणाले.
विजय वडेट्टीवार म्हणाले की, प्रत्येक राज्यातली संपत्ती लुटली जात आहे आणि ती गुजरातला पाठवली जात आहे. महाराष्ट्रातही तसेच होत आहे. महाराष्ट्रातले 80 टक्के कंत्राटदार हे गुजरातचे आहेत. त्यामुळे मराठी माणसांना त्रास होत आहे. या सरकारला महाराष्ट्रातले कंत्राटदार मिळत नाहीत का? गुजराती कंत्राटदारांना जमिनी दिल्या जात आहेत. महाराष्ट्रातले लोक काय करणार असेही वडेट्टीवार म्हणाले.
#WATCH | Delhi: After Maharashtra Congress screening meeting, LoP Maharashtra Assembly & Congress leader, Vijay Wadettiwar says, “…Every state is being looted and wealth is being deposited in Gujarat, Maharashtra is also going to be looted the same way and 80% contractors of… pic.twitter.com/7QjmKxfZZ1
— ANI (@ANI) October 16, 2024