मिल बैठेंगे तीन यार! चंद्राबाबू नायडू तळीरामांवर मेहरबान, अवघ्या 99 रुपयांत मिळणार दारू

आम्ही सत्तेवर आलो तर वाजवी दरात उत्तम दर्जाची दारू देऊ असे वचन चंद्राबाबू नायडू यांनी विधानसभा निवडणुकीत दिले होते. आता नायडू यांनी आपले वचन पूर्ण केले आहे. आंध्र प्रदेशमध्ये कुठल्याही ब्रॅण्डची दारू आता अवघ्या 99 रुपयांत मिळणार आहे.

मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी नवीन मद्य धोरण आखले आहे. त्यानुसार कुठल्याही व्यक्तीला लॉटरीमधून दारू पिण्याचा परवाना मिळणार आहे. दारुची दुकानं आधी सरकारी होती आता ती खासगी असणार आहेत.

एनटीआर जिल्ह्याचे न्यायदंडाधिकारी डॉ. जी श्रीजना सांगितले की 113 दारूच्या दुकानांसाठी 5 हजार 825 अर्ज आले आहेत. त्यात लॉटरी पद्धतीने अर्जदारांना परवाना दिला जाईल. या नवीन मद्यधोरणानुसार आंध्र प्रदेशात कुठल्याही ब्रॅण्डची 180 एमएल दारूची बाटली फक्त 99 रुपयांत मिळणार आहे. दारुचा दर्जा, प्रमाण आणि ग्राहकांना परवडण्यासाठी नवीन मद्यधोरण तयार करण्यात आले आहे. लॉटरी सिस्टममधून अर्जदारांना दारू विकण्याचे दोन वर्षांसाठी परवाना मिळणार आहे.

दारू विकण्याचा परवान्यासाठी अर्ज करताना अर्जदारांना दोन लाख रुपये शुल्क भरावे लागणार आहे. हे शुल्क रिफंडेबल नसणार आहे. सकाळी 10 ते रात्री 10 दरम्यान ग्राहकांना दारू विकत घेता येणार आहे. परवान्यासाठी चार स्लॅब तयार करण्यात आले आहेत. 50 लाख ते 85 लाख पर्यंत हे स्लॅब असणार आहे. सर्व दारुच्या दुकानांपैकी 10 टक्के दुकानं ही ताडीविक्रीसाठी आरक्षित ठेवले जाणार आहेत.