काही महिन्यांपूर्वी सोशल मीडियावर रश्मिका मंदानाचा डिपफेक व्हिडिओ व्हायरल झाला होता. डिपफेक व्हिडिओची ती बळी ठरली होती. या पार्श्वभूमीवर रश्मिका आता सायबर सेफ्टी आणि सायबर क्राइम याविषयी जनजागृती करणार आहे. गृह मंत्रालयाच्या अंतर्गत असलेल्या इंडियन सायबर क्राइम कोऑर्डिनेशन सेंटर (I4C) द्वारे सायबर सुरक्षेला प्रोत्साहन देण्यासाठी रश्मिकाची राष्ट्रीय राजदूत म्हणून निवड झाली आहे. रश्मिकाने स्वतः ही बातमी शेअर केली आहे.
रश्मिका मंदाना अलीकडेच डिपफेक एआय ट्रेंडची शिकार झाली होती. त्यामुळे सायबर गुन्ह्यांबद्दल जागरूकता निर्माण करणे आणि डिजिटल सुरक्षितता राखण्यासाठी टिप्स शेअर करणे होते. मी सायबर समस्यांबद्दल जागरुकता निर्माण करण्यासाठी आणि सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी सायबर सुरक्षिततेचा संदेश देणार आहे.
हा एक व्यापक धोका आहे. जगातील समस्यांबद्दल जागरुकता वाढवण्यासाठी आणि सायबर सुरक्षेचा संदेश देण्यासाठी मी सज्ज आहे. सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी, सामना करण्यासाठी आणि डिजिटल व्यवस्थांचे रक्षण करण्यासाठी आपण एकत्र येणे गरजेचे आहे, असे रश्मिकाने म्हटले.
ऑनलाइन फसवणूक, डीपफेक व्हिडिओ आणि सायबर धमक्यांबद्दल नागरीकांना शिक्षित करण्याच्या उद्देशाने सायबर जागृती मोहिमेचे नेतृत्व करेल. तंत्रज्ञानाचा अयोग्य वापर करू नये, याची माहिती रश्मिका व्हिडिओतून देणार आहे.