फ्रान्सचा स्टार फुटबॉलपटू कायलियन एमबाप्पे याच्यावर स्वीडनमध्ये बलात्काराचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे फुटबॉल विश्व हादरले असून चहूबाजूंनी त्याच्यावर टीका केली जात आहे. तसेच त्याची नेशन्स लीगसाठी फ्रान्सच्या संघात सुद्धा निवड करण्यात आलेली नाही.
स्वीडनच्या Aftonbladet या वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार, कायलियन एमबाप्पेची नेशन्स लीगसाठी निवड करण्यात आलेली नाही. त्यामुळे त्याने आपली सुट्टी आनंदात घालवण्यासाठी काही मित्रांसह स्वीडनला गाठले होते. स्वीडनमध्ये स्टॉकहोमच्या सिटी सेंटरमधील एका रेस्टॉरंटमध्ये जेवण झाल्यानंतर त्याने एका महिलेवर बलात्कार केला. पीडित महिलेने स्टॉकहोम पोलीस ठाण्यात एमबाप्पेविरुद्ध तक्रार दाखल केली आहे.
FAKE NEWS !!!! ❌❌❌
Ça en devient tellement prévisible, veille d’audience comme par hasard 😉 https://t.co/nQN98mtyzR— Kylian Mbappé (@KMbappe) October 14, 2024
एमबाप्पेने सगळे आरोप फेटाळून लावत एक्सवर पोस्ट शेअर करत आपली बाजू मांडली आहे. तो म्हणाला की, “ही एक अफवा असून यामुळे मला धक्का बसला आहे. मी या वृत्तापत्राविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यासाठी सल्ला घेत आहे, ” असं म्हणत त्याने सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.