एअर इंडिया विमानात बॉम्ब ठेवल्याची अफवा, अयोध्या विमानतळावर खळबळ

जयपूरहून अयोध्येला येणाऱ्या एअर इंडियाच्या विमानात बॉम्ब ठेवल्याची माहिती मिळाल्याने अयोध्या विमानतळावर एकच खळबळ उडाली. विमानाचे अयोध्या विमानतळावर सुरक्षित लँडिंग करत विमानाची तपासणी सुरू केली. मात्र विमानात संशयास्पद असे काहीच आढळले नाही.

विमान लँडिंग होताच सर्व प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले. सध्या सर्व प्रवाशांना विमानतळावरच थांबवून ठेवले आहे. पोलिसांनाही अलर्ट करण्यात आले असून विमानतळावर सर्वत्र तपासणी करत आहेत. विमानतळावर कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. विमानतळावर कोंबिंग ऑपरेशन सुरू आहे.