अशोक गहलोत, सचिन पायलटकडे महाराष्ट्राची जबाबदारी, काँग्रेसने केली वरिष्ठ निरीक्षकपदी नेमणूक

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांची घोषणा करण्यात आली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने तारखा जाहीर केल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर काँग्रेसने राज्यांसाठी वरिष्ठ निरीक्षकांची नियुक्ती केली आहे. राजस्थानचे माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांच्यावर काँग्रेसने मोठी जबाबदारी सोपवली आहे.

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने एक प्रसिद्धीपत्रक जारी केले आहे. या पत्रात काँग्रेस अध्यक्षांनी  वरिष्ठ निरीक्षक आणि राज्य निवडणूक वरिष्ठ समन्वयक यांची नेमणूक केली आहे. मुंबई आणि कोकण, विदर्भ (अमरावती आणि नागपूर), मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र या भागांसाठी वरिष्ठ निरीक्षकांची नेमणूक करण्यात आली.

पाच क्षेत्रात वरिष्ठ पर्यवेक्षकांची नियुक्ती- 

मुंबई आणि कोकण प्रदेश: अशोक गेहलोत, जी. परमेश्वर

मराठवाडा : सचिन पायलट, उत्तम रेड्डी

विदर्भ : भूपेश बघेल, चरणजितसिंग चन्नी, उमंग सिंगर

पश्चिम महाराष्ट्र : टी.एस.सिंग देव, एम.बी.पाटील

उत्तर महाराष्ट्र : नासीर हुसेन, अनुसया सीताक्का