शाहरुखची ‘फौजी’ मालिका 35 वर्षानंतर पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला, जाणून घ्या कधीपासून होणार सुरु

बॉलीवूडचा  ‘किंगखान’ शाहरुख खान याची आयकॉनिक मालिका ‘फौजी’ 35 वर्षानंतर पुन्हा सुरु होत आहे. ‘फौजी 2’ या वर्षी दूरदर्शनवर सुरु होणार असून विकी जैन आणि गौहर खानसह नवीन कलाकारही यामध्ये दिसणार आहेत. या मालिकेचे निर्माते संदीप सिंग आहेत.

शाहरुख खानने बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम करण्यापूर्वी दूरदर्शनच्या काही मालिकांमध्ये काम केले होते. त्याने ‘फौजी या मालिकेतून आपल्या कारकि‍र्दीला सुरुवात केली. रिपोर्ट्सनुसार, 35 वर्षांनंतर शाहरुखची सीरियल फौजी ही नवीन रुपात ‘फौजी 2’ घेऊन परतत असून याचवर्षी दूरदर्शनवर प्रसारित होणार आहे. मात्र, यावेळी शाहरुख दिसणार नसून नवे चेहरे दिसणार आहेत. ट्रेड ॲनालिस्ट तरण आदर्श यांनी ‘फौजी 2’शी संबंधित अपडेट इंस्टाग्रामवर शेअर केले आहे.

शाहरुख खानच्या 1989 मध्ये आलेल्या ‘फौजी’मालिकेचा नवा भाग ‘ फौजी 2’ येत आहे. ट्रेड ॲनालिस्ट तरण आदर्श यांनी त्यांच्या इंस्टाग्रामवर ‘ फौजी 2’चे अपडेट शेअर केले आहे. व्हिडिओ शेअर करताना त्यांनी लिहिले की,संदीप सिंग यांनी शाहरुखच्या आयकॉनिक मालिकेचा नवा भाग ‘ फौजी 2’ लाँच केला. 1989 ची मालिका #Fauji ज्यामध्ये #ShahrukhKhan आपल्या अभिनयाला सुरुवात केली होती. ती मालिका आता नव्या रुपात येत आहे. संदीप सिंह दूरदर्शनच्या सहकार्याने ‘फौजी 2’ मालिकेची आधुनिक आवृत्ती घेऊन येत आहेत. ही मालिका या वर्षी प्रसारित केली जाईल, मात्र अद्याप तिची लॉन्चिंग तारीख जाहीर केली गेली नाही.

 

View this post on Instagram

 

A post shared by Taran Adarsh (@taranadarsh)

निर्माते संदीप सिंग यांची नवीन मालिका ‘फौजी 2’ मध्ये अभिनेत्री अंकिता लोखंडेचा पती विकी जैन आणि अभिनेत्री गौहर खान मुख्य भूमिकेत आहेत.याशिवाय या मालिकेत 12 नवीन चेहरे दिसणार आहेत. आशिष भारद्वाज, उत्कर्ष कोहली, रुद्र सोनी, अमरदीप फोगट, अयान मनचंदा, नील सतपुरा, सुवंश धर, प्रियांशू राजगुरू, अमन सिंग दीप, उदित कपूर, मानसी आणि सुष्मिता भंडारी अशी त्यांची नावे आहेत.

प्रसिद्ध गायक सोनू निगम यांनी ‘फौजी 2’ च्या टायटल ट्रॅकला आपला आवाज दिला आहे. या मालिकेत एकूण 11 गाणी असून त्याचे संगीत श्रेयस पुराणिक यांनी दिले आहे. यात शरद केळकर यांचा आवाज आहे. ‘फौजी 2’चे निर्माते संदीप सिंग आहेत आणि सहनिर्माते विकी जैन-जफर मेहंदी आहेत. समीर हलीम हे त्याचे क्रिएटिव्ह हेड आहेत आणि ‘फौजी 2’ चे दिग्दर्शन अभिनव पारीक यांनी केले आहे.