बृहन्मुंबई वृत्तपत्र विक्रेता संघातर्फे नवदुर्गांचा सन्मान

बृहन्मुंबई वृत्तपत्र विक्रेता संघ, लोअर परळ विभाग आणि शिवशाहू प्रतिष्ठानच्या वतीने नवरात्रौत्सवानिमित्त विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या नवदुर्गांचा सन्मान करण्यात आला.

ना. म. जोशी मार्ग सार्वजनिक उत्सव मंडपात संपन्न झालेल्या या सोहळय़ात मेघना बुरांडे (पोलीस निरीक्षक), शर्वाणी पिल्ले (अभिनेत्री), डॉ. अंजली परांडे (नायर हॉस्पिटल), वैशाली शिंदे (योगशिक्षिका), रंजना जाधव (उद्योजिका), बंदिनी विनरकर (वृत्तपत्र विक्रेता), रुपाली जाधव (माहिती अधिकार), क्षमा सावंत (पाळणाघर), वीणा कदम (समाजसेविका) यांच्यासह थायलंड येथे झालेल्या 11 देशांच्या इंडोरन्स वर्ल्ड फेडरेशन इंटरनॅशनल चॅम्पियन्स स्पर्धेत स्केटिंगमध्ये तीन सुवर्णपदके पटकावणाऱ्या सहा वर्षीय ज्येष्ठा पवार हिचा सन्मान करण्यात आला.

या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून ना. म. जोशी मार्ग पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद चंदनशिवे, कृष्णा पाटील, डॉ. निलेश मानकर, रवींद्र देसाई, प्रकाश चव्हाण, राजू येरुडकर, रवींद्र धुरी, संतोष मोरे उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बृहन्मुंबई वृत्तपत्र संघाचे संघाचे विश्वस्त जीवन भोसले यांच्यासह धनाजी बुगडे, तानाजी धनुकटे, संदीप चव्हाण, विनायक आसबे, संतोष वर्टेकर, सतीश पाटील, नरेश गडाळे, अमर गावडे, शंकर रिंगे, विक्रम पाटील, संदीप वाघराळकर, भरत पाटील, प्रसाद भोसले व किरण पाटील यांचे सहकार्य लाभले. तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रज्ञा पवार यांनी केले.