
सामूहिक बलात्कारानंतर पीडितेला मृत समजून तिच्या घरासमोर फेकून देण्यात आल्याची संतापजनक घटना राजस्थानात घडली. पोलिसांनी या प्रकरणात चार नराधमांच्या मुसक्या आवळल्या आहेत.
जयपूरच्या जयसिंगपुरा खोर भागात राहणारी एक 22 वर्षीय तरुणी रात्री उशिरापर्यंत घरी परतली नाही. हवालदिल झालेल्या वडिलांनी तिचा सर्वत्र शोध घेतला. मध्यरात्री अचानक एक भरधाव गाडी त्यांच्या घरासमोर थांबली आणि तरुणीला फेकून पसार झाली. तिची अवस्था पाहून वडिलांनी तिला तात्काळ रुग्णालयात दाखल केले. पोलिसांनी तक्रार दाखल होताच वेगाने चक्रे फिरवून अगोदर दोन आणि नंतर दोघा नराधमांच्या मुसक्या आवळल्या. जयपूरच्या पोलीस उपायुक्त राशी डोगरा यांनी पत्रकारांना ही माहिती दिली. नराधमांची बोलेरो गाडीही जप्त करण्यात आल्याचे डोगरा यांनी सांगितले.