ज्येष्ठ उद्योजक आणि टाटा सन्सचे माजी चेअरमन हिंदुस्थानचे उद्योग महर्षी रतन टाटा यांचे 9 ऑक्टोबर रोजी निधन झाले. टाटा यांच्या निधनामुळे संपूर्ण देश हादरला होता. रतन टाटा यांच्यानंतर टाटा ट्रस्टची धुरा नोएल टाटा यांच्याकडे सोपवण्यात आली. मात्र टाटा ग्रुपचे उत्तराधिकारी म्हणून नोएल टाटा यांच्यासोबत माया टाटा या नावाची जोरजार चर्चा सुरू होती.
कोण आहेत माया टाटा?
माया टाटा या नोएल टाटा आणि आलू मिस्त्री यांची मुलगी आहे. तर दिवंगत रतन टाटा यांची भाची आहे. माया टाटा (34) यांनी परदेशातून शिक्षण पूर्ण केले असून त्यानंतर टाटा समूहातही महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत. प्राथमिक माहितीनुसार रतन टाटा यांच्या निधनानंतर माया यांना TATA TRUST चे संभाव्य उत्तराधिकारी मानले जात होते. मात्र, बोर्डाच्या बैठकीत नोएल टाटा यांची टाटा ट्रस्टच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली.
माया टाटा यांमी ब्रिटेनच्या सुप्रसिद्ध ब्रिटीश बिझनेस स्कूलमधून शिक्षण घेतले आहे. तसेच वारविक विद्यापीठातून देखील पदवी प्राप्त केली आहे. मात्र, परदेशात शिक्षण घेतले असले तरी माया यांनी आपल्या करिअरची सुरुवात टाटा ग्रुपसोबत करण्याचे ठरवले. टाटा कॅपिटलची उपकंपनी असलेल्या टाटा अपॉर्च्युनिटीज फंडामधून कामाला सुरूवात केली. यासोबतच टाटा ग्रुपमध्ये टाटा न्यू लाँच करण्यात माया टाटा यांचा मोठा वाटा आहे. तसेच त्यांनी व्यवस्थापन आणि गुंतवणुकीशी संबंधित सर्व जबाबदाऱ्या चांगल्या प्रकारे पार पाडल्या आहेत. टाटा अपॉर्च्युनिटीज फंड बंद झाल्यावर माया टाटा डिजिटलमध्ये काम करत आहेत.
टाटांचे उत्तराधिकारी नोएल टाटा, टाटा ट्रस्टच्या अध्यक्षपदी नियुक्ती