रत्नागिरीत खेर्डी पानवाडीत मिंधेंना झटका, कार्यकर्त्यांनी हाती बांधले शिवबंधन

दापोली शहराला लागूनच असलेल्या खेर्डी गावाच्या पानवाडीने कार्यरत मिंधे गटाची साथ संगत सोडत वाडी प्रमुख विनेश विश्राम बर्जे यांच्यासह संपुर्ण पान वाडीने आपल्या असंख्य ग्रामस्थांसह शिवसेना ( उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षात जाहीर पक्ष प्रवेश केला. हा पक्ष प्रवेश करण्यासाठी खेर्डी युवामंच अध्यक्ष शैलेश कदम यांनी विशेष प्रयत्न केले.

दापोली विधानसभा मतदार संघात माजी आमदार आणि शिवसेना जिल्हा प्रमुख संजय कदम यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे तसेच शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, युवासेनाप्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आणि मार्गदर्शनाने दापोली मंडणगड आणि खेड तालुक्यात शिवसेनेचा भगवा झंझावात निर्माण केला आहे. त्यामुळे दापोली विधानसभा मतदारसंघातील दापोलीसह मंडणगड तसेच खेड येथील मिंधे गटासह विविध पक्षातील कार्यरत असलेले कार्यकर्ते हे आपल्या कार्यरत असलेल्या मुळ पक्षातुन शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षात मोठ्या संख्येने पक्ष प्रवेश करत आहेत. अशाच प्रकारे सोमवारी 14 ऑक्टोबर 2024 रोजी दापोली तालुक्यातील खेर्डी पानवाडी येथील मिंधे गटाचे वाडी प्रमुख विनेश विश्राम बर्जे यांच्यासह वाडीतील गुरूनाथ रामचंद्र बर्जे, संदीप गोविंद भुवड, किरण हरी खामकर, वैभव सखाराम खामकर, बाळकृष्ण रामजी खामकर, नितिन काशिराम खामकर, काशिराम तानु जोशी, अशोक विश्राम बर्जे, रविंद्र कृष्णा काताळे, विलास रामचंद्र लाड, बाळाराम महादेव जोशी, रूपेश नारायण जोशी, ज्ञानेश्वर विश्राम जोशी, विनोद दत्ताराम काताळे, सुनिल नारायण जोशी, प्रदीप गोविंद भुवड आदी प्रमुख कार्यकर्त्यांसह पान वाडीतील कार्यरत संपूर्ण मिंधे गटातील कार्यकर्त्यांनी माजी आम. आणि उत्तर रत्नागिरी जिल्हयाचे जिल्हाप्रमुख संजय कदम यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षामध्ये जाहीर पक्ष प्रवेश केला. शिवसेना ( उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षात जाहीर प्रवेश करुन शिवसेनेचा भगवा हाती घेतलेल्या विनेश विश्राम बर्जे यांच्यावर खेर्डी उपशाखाप्रमुख पदाची जबाबदारी सोपवत त्यांच्यावर विश्वास व्यक्त केला आहे. तसे नियुक्तीचे पत्रही जिल्हाप्रमुख संजय कदम यांनी बर्जे यांना दिले.

यावेळी खेड पंचायत समितीचे माजी सभापती व उपजिल्हा प्रमुख विजय जाधव, भरणे विभाग प्रमुख अंकुश कदम, फुरुस विभाग प्रमुख दत्ता भिलारे, खेर्डी येथील प्रतिष्ठित व्यक्तीमत्व अरुण करबेले, संघटक सुनिल करबले, माजी उप सरपंच संजय म्हादलेकर, युवासेना उप तालुका अधिकारी किरण मोरे,खेड सुकिवली ग्रामपंचायत सदस्य परेश जाधव, स्वप्निल पाटील, मंदार शिर्के आदींसह शिवसेना पदाधिकारी तसेच शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.