ऐन निवडणुकीच्या तोंडावर शिर्डी मतदारसंघात विखे गटाला मोठे खिंडार पडले आहे. शिर्डी विधानसभा मतदारसंघातील मालुंजे या गावातील जनसेवा मंडळाच्या शेकडो कार्यकर्त्यांनी काँग्रेसचे आमदार बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षात प्रवेश केला.
कारखान्याचे चेअरमन बाबासाहेब ओहोळ, शेतकी संघाचे संचालक संतोष नागरे, मार्केट कमिटीचे संचालक संजय खरात, युवक काँग्रेसचे शेखर सोसे, सोसायटीचे व्हाइस चेअरमन सुमित सोसे, लहानू नागरे, कल्पेश आव्हाड, योगेश जोशी, मल्हारी ईघे आदी उपस्थित होते.
आमदार बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली संगमनेर तालुका हा विकासाचे मॉडेल ठरला आहे. याउलट भाजपमध्ये फक्त दडपशाही होत असून, निवडणुकीसाठी वापर केला जातो. त्यामुळे जनसेवा मंडळाच्या राजेंद्र आव्हाड, संपत सोसे, संदीप डोंगरे, प्रकाश खरात, संजय चाटे, भाऊसाहेब खरात, वैभव सोसे, साहेबराव सोसे, रमेश पिंपळे, सोमनाथ पिंपळे, संतोष घुगे, भिकाजी भागा घुगे, प्रवीण गाडेकर, गोविंद सोसे यांच्यासह शेकडो युवकांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
काँग्रेसमध्ये प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांचे आमदार बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, कॅन्सरतज्ञ डॉ. जयश्रीताई थोरात, मिलिंद कानवडे, बाबासाहेब ओहोळ, गणपतराव सांगळे, सुरेश थोरात, राजेंद्र चकोर, विक्रम थोरात यांनी स्वागत केले.