रणजी विजेत्या मुंबईला आपल्या नव्या मोसमाची सुरुवात गोड करण्याची नामी संधी लाभली आहे. तनुष कोटियनच्या फिरकीने बडोद्याचा दुसरा डाव 185 धावांत गुंडाळला आणि पहिल्या डावातील 76 धावांच्या पिछाडीमुळे मुंबईला विजयी श्रीगणेशा करण्यासाठी 262 धावा करायच्या आहेत.
बडोद्याने मुंबईची तिसऱ्या दिवसअखेर 2 बाद 42 अशी स्थिती केली असली तरी रणजीविजेता मुंबई विजयापासून 240 धावा दूर आहे. दोन्ही संघांनी विजयाची समान संधी असली तरी मुंबईच्या मधल्या फळीचा फॉर्म पाहाता मुंबई बडोद्यावर मात करण्याची अधिक शक्यता आहे. तिसऱ्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा कर्णधार अजिंक्य रहाणे 4 तर आयुष म्हात्रे 19 धावांवर खेळत होता.
रणजी करंडक क्रिकेट स्पर्धा – जम्मू-कश्मीरविरुद्ध महाराष्ट्राचा डाव संकटात! सिद्धेश, ऋतुराज लढले; पण…
रणजीच्या नव्या मोसमाची सुरूवात भन्नाट झालीय. रणजीविजेत्या मुंबईविरुद्ध बडोद्याने पहिल्या डावात आघाडी घेत सनसनाटी सुरूवात केली. मुंबईने बडोद्याची 5 बाद 90 अशी अवस्था केली होती. तरीही मितेश पटेल आणि अतित शेठने 130 धावांची भागी रचून बडोद्याला सावरले. मुंबईला सामन्यावर वर्चस्व प्रस्थापित करण्याची संधी होती, पण मुंबईच्या गोलंदाजांनी ती गमावली. त्यानंतर मुंबईच्या फलंदाजांनीही निराश केल्यामुळे बडोद्याला 76 धावांची आघाडी घेता आली.