राज्य नाट्य स्पर्धेचे सातारा जिल्ह्यात केंद्र; सांस्कृतिक संचालनालयाचे शिक्कामोर्तब

जिल्ह्यात राज्य नाट्य स्पर्धेचे केंद्र साताऱ्यात व्हावे, यासाठी खासदार उदयनराजे भोसले यांनी शासनदरबारी पाठपुरावा केला होता. त्याला यश आले आहे. महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक संचालनालयाच्या वतीने राज्य नाट्य स्पर्धेचे केंद्र म्हणून सातारा जिल्ह्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. या निर्णयाचे रंगकर्मीनी स्वागत केले आहे.

नवीन नाट्यसंहितेच्या नियमावलीत मागील 17 वर्षांपासून सातारा जिल्ह्यातील केंद्र बंद झाले होते. सातारा शहरासह जिल्ह्यातील नाट्यकर्मी व नाट्यरसिक राज्य नाट्य स्पर्धेला मुकला होता. पूर्वी दरवर्षी फक्त तीन ते चार संघ सातारा जिल्ह्यातून राज्य नाट्य स्पर्धेसाठी जिल्ह्याबाहेर जात होते. परंतु, अलीकडच्या काळात श्रीनिवास एकसंबेकर, राजेश मोरे, विक्रम बल्लाळ, रमेश खांडेकर, अभिजीत वाईकर, शशी गाडे, महादेव शिरोडकर व इतर रंगकर्मींच्या प्रयत्नातून साताऱ्यातून राज्य नाट्य स्पर्धेकरिता बारा संघ उभे राहिले. या सर्कांकडूनच राज्य नाट्य स्पर्धेचे केंद्र सातारा जिल्ह्यात व्हावे, या मागणीसाठी सकारात्मक दबाव शासनावर आला.

याच पार्श्वभूमीकर रंगकर्मींच्या वतीने बाळकृष्ण शिंदे यांनी जिल्ह्यातील जवळपास 25 संघांची मोट बांधत शासनदरबारी केंद्राची मागणी केली होती. दोन वर्षांपूर्की उपकेंद्राची निर्मिती झाली. परिणामी सांगली उपकेंद्राच्या रूपात सातारा जिल्ह्यात राज्य नाट्य स्पर्धा आली. या उपकेंद्रावर 2022 मध्ये 12, तर 2023 मध्ये तेरा नाटके सादर झाली होती. हा काढता प्रतिसाद पाहून राज्य नाट्य स्पर्धा समन्वयक कल्याण राक्षे यांनी सर्क रंगकर्मींच्या वतीने खासदार उदयनराजे यांच्याकडे सातारा उपकेंद्राचे केंद्र व्हावे , अशी मागणी केली. खासदार उदयनराजे यांनी या मागणीचा शासनदरबारी पाठपुरावा केला. त्यामुळे सातारा जिल्ह्यात राज्य नाट्य स्पर्धेचे केंद्र आले आहे.