Baba Siddique Murder – शासकीय इतमामात बाबा सिद्दीकी यांच्यावर अंत्यसंस्कार, अखेरचा निरोप देण्यासाठी कार्यकर्त्यांची गर्दी

 

माजी आमदार आणि राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दीकी यांच्यावर मुंबईत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी मोठ्या प्रमाणात राजकीय नेते आणि कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी सिद्दीकी यांचे पुत्र झिशान सिद्दीकी धाय मोकलून रडत होते.


बाबा सिद्दीकी यांचीवर वांद्र्यात गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. आज मुंबईतल्या मरीन लाईन्स जवळ बडा कब्रस्तानमध्ये त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यंसस्कार करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार, छगन भुजबळ, प्रफुल पटेल उपस्थित होते.

वांद्र्यातील निवास्थानातून सिद्दीकी यांची अंत्ययात्रा निघण्यापूर्वी त्याच्या निवासस्थानाबाहेर कार्यकर्ते आणि त्यांच्या चाहत्यांनी नमाज पठण केले. बडा कब्रस्तान इथे त्यांना दफन करण्यात आले. यावेळी मुसळधार पाऊस होता तरी कार्यकर्ते आणि चाहत्यांनी सिद्दीकी यांना अखेरचा निरोप देण्यासाठी गर्दी केली होती.