संधिवाताची समस्या वाढतेय? महिलांनो जीवनशैलीत करा असे बदल

कौटुंबिक जबाबदाऱ्या आणि कामाच्या ओझ्याखाली महिला अनेकदा त्यांच्या तब्येतीकडे दुर्लक्ष करतात, ज्यामुळे त्यांना संधिवात सारखे आजार वेळेत ओळखता येत नाहीत.

वाढत्या वयानुसार महिलांच्या शरीरात अनेक शारिरीक आणि मानसिक बदल होत असतात. अनेकदा महिला कामाच्या व्यापात स्वत:ची काळजी घेणं टाळतात. ज्यामुळे महिला अनेक आजाराला बळी पडतात. आजकाल संधिवात हा सामन्यत: कोणत्याहि वयोगटातल्या व्यक्तीमध्ये आढळून येतो. हा आजार विशेषत: महिलांमध्ये जास्त प्रमाणात आढळून येतो. अशा परिस्थितीत सुरुवातीच्या काही लक्षणांमुळे त्यावर नियंत्रण ठेवता येते. त्याची लक्षणे आणि प्रतिबंध जाणून घ्या..

वास्तविक, महिलांचे सांधे अधिक लवचिक असतात, त्यामुळे त्यांना झीज होण्याची अधिक शक्यता असते, त्यामुळे ऑस्टियोआर्थरायटिसचा धोका वाढतो. याशिवाय हार्मोन्समधील बदलही यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावतात. विशेषतः म्हणजेच मेनोपॉज दरम्यान, स्त्रियांच्या शरीरात इस्ट्रोजेन कमी होते, ज्याचा सांध्यांवर संरक्षणात्मक प्रभाव पडतो. अशा परिस्थितीत शरीरात इस्ट्रोजेनच्या कमतरतेमुळे सूज आणि सांधेदुखी होऊ शकते.

जेव्हा संधिवात होतो तेव्हा त्याची सुरुवातीची लक्षणे दिसून येतात. ज्यामध्ये सांधेदुखी, सूज,थकवा, वेग कमी होणे अशी लक्षणे आहेत.
या आजारातून स्वत:चे रक्षण करण्यासाठी महिलांनी या गोष्टी केल्या पाहिजेत.

1.सांधेदुखीचा धोका कमी करण्यासाठी शारीरिकदृष्ट्या सक्रिय राहणे महत्त्वाचे आहे.

2.यासाठी तुम्ही चालणे, पोहणे किंवा योगासारखे सोपे व्यायाम करा.

3.जास्त वेळ सतत न बसण्याचा प्रयत्न करा आणि मध्येच ब्रेक घ्या.