‘बेबी जॉन’ चित्रपटातील जॉकि श्रॉफचा फर्स्ट लूक रिलीज; ‘बब्बर शेर’ बनून जग्गू दादा चा बॉक्सऑफिसवर धमाका

वरुन धवन आणि जॉकि श्रॉफचा आगामी चित्रपट ‘बेबी जॉन’ लवकरच प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात जॉकि श्रॉफचा खलनायकाच्या भूमिकेतील अनोखा फर्स्ट लूक समोर आला आहे.

वरुन धवनच्या येणाऱ्या चित्रपटाची सोशल मिडियावर जोरदार चर्चा रंगताना दिसत आहे. ख्रिसमसच्या मुहुर्तावर हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात अभिनेता जॉकि श्रॉफ खनायकाच्या भूमिकेत दिसनार आहेत. ‘बेबी जॉन’ चित्रपटातील जॅकी श्रॉफचा फर्स्ट लूक समोर आला आहे, ज्यामुळे चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. ‘बब्बर शेर’ जॅकी श्रॉफचा लूक पाहून या चित्रपटाची उत्सुकता वाढली आहे.

दसऱ्याच्या दिवशी जग्गू दादाचा ‘बेबी जॉन’ चित्रपटातील खलनायक भूमिकेतील फर्स्ट लूक निर्मात्यांनी सोशल मिडियावर पोस्ट केला आहे. यामध्ये जॉकि श्रॉफचं रौद्र रुप दिसत आहे. तसेच त्यामधे त्यांचे पांढरे केस,चेहऱ्यावरचे गंभिर हावभाव, जुनी अंगठी आणि गळ्यात चैन घातलेला या लूक मध्ये दिसून येत आहे. जग्गू दादाचा हा लूक चाहत्यांच्या चांगलाच पसंतीत पडला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Jio Studios (@officialjiostudios)


वरुण धवनचा आगामी चित्रपट ‘बेबी जॉन’ यंदाच्या ख्रिसमसला ॲक्शन एंटरटेंनमेंट घेऊन येणार असल्याचं समजलं आहे. अनेक महिन्यांपासून या चित्रपटाची चर्चा सुरू होती. या चित्रपटातील वरुण धवनचा लूक आधीच समोर आला आहे आणि आता निर्मात्यांनी जॅकी श्रॉफचा घातक अवतारही प्रेक्षकांसमोर आणला आहे. जिओ स्टुडिओजने दसऱ्याच्या मुहूर्तावर ‘बेबी जॉन’ चित्रपटातील अभिनेता जॅकी श्रॉफचा किलर लूक उघड केला. ज्यामध्ये जॅकी श्रॉफचा लूक थरकाप उडवणारा आहे. या हाय-ऑक्टेन ॲक्शन चित्रपटात जॅकी श्रॉफ खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटातून पहिल्यांदाच वरुण धवन जबरदस्त ॲक्शन चित्रपटात दिसणार आहे. कॅलिस दिग्दर्शित ‘बेबी जॉन’ हा एक मेगा-बजेट चित्रपट असल्याचे समजले आहे.