Jalna crime news – धारधार हत्यारानं खून, पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह विहिरीत टाकला, 24 तासात आरोपीला बेड्या

जालन्यातील भोकरदन तालुक्यातील मौजे सिरसगाव मंडप शिवारात 10 ऑक्टोबर रोजी गळ्यावर धारधार हत्याराने वार करून खून झाल्याचे समोर आले होते. या प्रकरणातील आरोपीच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अवघ्या 24 तासात मुसक्या आवळल्या आहेत. अन्वर शहा महंमद शहा (वय – 19, रा. नारेगाव छत्रपती संभाजीनगर) असे असे आरोपीचे, तर शेख नवाज शेख रफिक (वय – 17, रा. गुलशेर नगर मालेगाव जि. नाशिक) असे मयताचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस ठाणे भोकरदन हद्दीमध्ये मौजे सिरसगाव मंडप शिवारात सोमिनाथ सहाने यांच्या शेत गट नं 224 मधील विहिरीमध्ये एक मृतदेह आडळून आलो होता. मृताच्या गळ्यावर धारधार हत्याराचे वार होते. पुरावा नष्ट करण्यासाठी त्याला विहिरित टाकण्यात आले होते. याप्रकरणी भोकरदन पोलीस ठाण्यात 10 ऑक्टोबर रोजी भादवी कलम 103 (1), 238 अन्वये अज्ञात आरोपीविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला होता.

Jalna crime news – जालन्यात कंटेनरसह 1 कोटी रुपयांचा गुटखा जप्त

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव यांनी पोलीस ठाणे भोकरदन येथील गुन्ह्यातील मयताची ओळख पटविणे व अज्ञात आरोपीचा शोधा बाबत स्थानिक गुन्हे शाखाचे एक विशेष पथक नेमले. प्राथमित तपासात मयत हा मालेगाव येथील रहिवासी असून त्याचे नाव शेख नवाज शेख रफिक असल्याचे उघड झाले. मागील काही दिवसापूर्वी त्याला छत्रपती संभाजीनगर शहरातील नारेगाव येथे राहणाऱ्या मित्रासह पाहिल्याचे समोर आले. पोलिसांनी अधिक तपास केला असता मयत तरुण नारेगाव येथे राहणाऱ्या अन्वर शहा महंमद शहा यास भेटण्यासाठी छत्रपती संभाजीनगर शहरात आला
असल्याची माहिती मिळाली. तो ट्रकवर हेल्पर म्हणून मजुरी करतो.

अन्वर शहा महंमद शहा याचा छत्रपती संभाजीनगर व अहिल्यानगर जिल्ह्यात शोध घेतला असता 12 ऑक्टोबर रोजी रात्री अहिल्यानगर जिल्ह्यातील कामरगाव शिवारातील हॉटेल महाज्योत येथे आढळून आला. त्याने मित्राचा खून केल्याची कबुली दिली. पोलिसांना त्याला अटक करून पुढील तपाससाठी पोलीस ठाणे भोकरदन येथे नेले आहे.