चीन आणि पाकिस्तानच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी केंद्र सरकारने 52 गुप्तचर उपग्रहांना दिली मान्यता

चीन आणि पाकिस्तानच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी हिंदुस्थान पुढील पाच वर्षांत 52 गुप्तचर उपग्रह पृथ्वीच्या कक्षेत प्रक्षेपित करणार आहे. हे उपग्रह लष्करासाठी खूप उपयुक्त ठरतील.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील सुरक्षाविषयक मंत्रिमंडळ समितीने 7 ऑक्टोबर रोजी अंतराळ आधारित पाळत ठेवणे (SBS-3) कार्यक्रमाच्या तिसऱ्या टप्प्याला मंजुरी दिली आहे. याअंतर्गत हे उपग्रह पृथ्वीच्या खालच्या कक्षेत आणि भूस्थिर कक्षेत स्थापित केले जातील.

हे सर्व उपग्रह एआयवर आधारित असतील. म्हणजे उपग्रह एकमेकांशी संवाद साधू शकतील. यामुळे पृथ्वीवर सिग्नल पाठवणे आणि संदेश आणि चित्रे पाठवणे सोपे होणार आहे. 52 उपग्रहांच्या प्रक्षेपणासाठी सुमारे 27,000 कोटी रुपये खर्च येणार आहे. इस्त्रोद्वारे 21 तर खासगी कंपन्यांद्वारे 31 उपग्रह तयार करण्यात येतील.