माजी राज्यमंत्री आणि अजित पवार गटात सामील झालेले नेते बाबा सिद्दीकी यांची वांद्रे येथे गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. त्यांच्या हत्येने संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे. या हत्येनंतर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, युवासेनाप्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी राज्यातील सुरक्षा व्यवस्थेवरून राज्य सरकारला फटकारले आहे. ” राज्यातील कायदा-सुव्यवस्था संपूर्णपणे ढेपाळलीय अशी प्रतिक्रीया आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केली.
The murder of Baba Siddiqui ji is shocking.
We pray for his soul to rest in peace and send our condolences to his family and friends.This, sadly reflects on the law and order situation in Maharashtra. The complete collapse of administration, law and order.
— Aaditya Thackeray (@AUThackeray) October 12, 2024
”बाबा सिद्दीकी यांची हत्या हे अत्यंत धक्कादायक आहे. त्यांच्या आत्म्याला शांती लाभो. या दुखात आम्ही त्यांच्या कुटुंबासोबत आहोत. मात्र या घटनेतून महाराष्ट्रातील कायदा व सुव्यवस्था किती ढेपाळली आहे ती दिसून येतेय, अशा शब्दात आदित्य ठाकरे यांनी त्यांची प्रतिक्रीया व्यक्त केली.