बॉलीवूडमध्ये जातीभेद, तुच्छ वागणूक दिली जाते; अभिनेत्री कोंकणना सेनचा गंभीर आरोप

बॉलीवूड म्हटलं की नेपोटीझम आलचं असा सगळ्यांचा समज आहे. बॉलीवूडमध्ये नव्या कलाकाराला संधी मिळण्याआधी स्टार किड्सना चित्रपट मिळतात. मात्र बाहेरून आलेल्या छोट्या कलाकारांना इंडस्ट्रीमध्ये काम मिळवण्यासाठी खूप खस्ता खाव्या लागतात. बॉलीवूडमध्ये फक्त नेपोटिझमच नाही तर जातीचं राजकारण चालतं. कोणी काय खावे, कुठे बसावे? अशा सगळ्या गोष्टी तुमची जात बघून ठरवल्या जातात. याबाबत एका अभिनेत्रीने मोठा खुलासा केला आहे.

अभिनेत्री कोंकना सेन हिने एका मुलाखतीत बॉलीवूडमधील सत्य परिस्थितीचा उलगडा केला. कोंकनाने फिल्म इंडस्ट्रीतील अनेक गोष्टींचा खुलासा कोंकनाने केला. तुमची जात पाहून त्यानुसार, तुम्हाला इंडस्ट्रीमध्ये वागणूक दिली जाते, असं कोंकनाने यावेळी सांगितले. सेटवर मुलींसोबत अश्लील चाळे केले जातात आणि इंडस्ट्रीमधील दिग्गज लोक असं आक्षेपार्ह वर्तन करतात, यामुळेच कुणी याविरोधात आवाज उठवत याचा विरोध करत नाही. इंडस्ट्रीमध्ये जातीच्या आधारे भेदभाव करत लोकांना तुच्छ वागणूक दिली जाते. असेही ती यावेळी म्हणाली.

अनेकदा सेटवर मुलींसोबत अनेक विचित्र प्रकार घडतात. मुलींसोबत अश्लील चाळे केले जातात आणि इंडस्ट्रीमधील दिग्गज लोक असे किळसवाणे कृत्य करतात. मात्र कुणीही याविरोधात आवाज उठवत नाहीत. इंडस्ट्रीमध्ये जातीच्या आधारे भेदभाव करत लोकांना तुच्छ वागणूक दिली जाते. असे स्पष्ट वक्तव्य कोकनाने एका मुलाखतीत केलं आहे.

कोंकनाने मल्याळम इंडस्ट्रीत होणाऱ्ंया लैंगिक अत्याचाराबाबतही प्रतिक्रिया दिली. चित्रपटाच्या सेटवर आणि संपूर्ण फिल्म इंडस्ट्रीमध्ये जाती आणि धर्माच्या आधारे लोकांना वागणूक दिली जातो. कुणी कुठे बसायचं? बसायची परवानगी आहे की नाही? कुणी काय खायचं? बाथरुम कोण वापरणार? हे सर्व जातीच्या आधारे ठरवलं जातं असे ती म्हणाली.