मल्टिवर्स- बेड टाइम स्टोरीज

>> डॉ. स्ट्रेंज

स्किटर आणि वेंडी या भावंडांना त्यांच्या वfिडलांनी ऐकवलेल्या ‘बेड टाइम स्टोरी’ त्यांच्या आयुष्याचा एक भाग असतात. जगण्याशी लढण्याचे बळ देणाऱया या कथा स्किटरच्या आयुष्यावर खूप पfिरणाम करतात. पुढे त्याच्या मुलांनाही कथांची गोडी लागते आणि ते स्वतच कथा रचू लागतात. ज्यांची स्किटरला प्रत्यक्ष अनुभूती येते, ही अनुभूती म्हणजे नेमकं काय हे सांगणारा हा चित्रपट.

2008 साली आलेला ‘बेड टाइम स्टोरीज’ हा एक धमाल पॅंटसी चित्रपट आहे. अॅडम सॅंडलरने स्वत प्रोडय़ुस केलेल्या या चित्रपटात नायकाची भूमिकादेखील साकारली आहे. चित्रपटाची कथा सुरू होते ती स्कीटर आणि वेंडी या दोन लहानग्यांपासून. आपल्या वडिलांसोबत हे दोघेही राहत असतात. स्कीटर आणि वेंडीच्या वडिलांचे स्वतचे एक छोटेसे हॉटेल असते. दिवसभर हॉटेल सांभाळायचे, आपल्या लहानग्याबरोबर दिवस घालवायचा आणि रात्री झोपताना दोघांना एक छानशी बेड टाइम स्टोरी ऐकवायची असा वडिलांचा दिपाम असतो. ते दोन्ही मुलांना खूप वेगवेगळ्या आणि रोमांचक कथा रचून सांगत असतात.

काही काळाने दोघांच्या वडिलांची आर्थिक परिस्थिती खूप बिघडते आणि ते पूर्णपणे दिवाळखोर होतात. काही उपाय न उरल्याने शेवटी ते आपले हॉटेल एका दुसऱया व्यावसायिकाला विकतात. स्कीटर मोठा झाल्यावर त्याला या हॉटेलचा मॅनेजर बनवण्यात येईल आणि तो हे हॉटेल चालवेल असे वचन हा नव्या व्यावसायिक देतो. काळ वेगाने पुढे जातो. स्कीटर आणि वेंडीच्या वडिलांचे निधन होते. व्यावसायिकाने आता त्या छोटय़ा हॉटेलचे मोठय़ा आणि भव्य अशा हॉटेलात रूपांतर केलेले असते. आपले दिलेले वचनदेखील त्याने पाळलेले असते. मात्र स्कीटरला मॅनेजर न बनवता हॅंडीमॅनचे अर्थात विविध उपकरणांच्या देखभालीचे काम देण्यात आलेले असते. दुसरीकडे वेंडीचादेखील घटस्फोट झालेला असतो.

एकदा तरी आपल्याला मॅनेजर म्हणून संधी मिळेल अशा आशेवर असलेल्या स्कीटरला मोठा धक्का बसतो, जेव्हा तो बिझनेसमन नवा मॅनेजर म्हणून आपल्या मुलीच्या प्रियकराची निवड करतो. इकडे नोकरीच्या मुलाखतीसाठी शहराबाहेर जाणार असलेल्या वेंडीच्या दोन्ही मुलांना सांभाळण्याची जबाबदारी आता स्कीटरवर येते. रात्री झोपताना दोन्ही मुले कथा ऐकवण्याची विनंती करतात. पण दोन्ही भाच्यांकडे एकही चांगले कथांचे पुस्तक नसल्याने स्कीटर त्यांना स्वत: एक कथा रचून सांगायला सुरुवात करतो.

या कथेत तो स्वत:ला एक शूर वीर योद्धय़ाच्या स्वरूपात सादर करतो. हा योद्धा खूप परामी असतो, पण राजाला मात्र त्याची कदर नसते. एक तरी संधी मिळेल अशा आशेवर असलेल्या या योद्धय़ाला राजा सरळ सरळ डावलतो. स्कीटरच्या या कथेत त्याच्या खऱया आयुष्याचे प्रतिबिंब पडलेले असते. या कथेचा नायक शेवटी आत्महत्या करतो. मात्र मुलांना ही कथा काही आवडत नाही आणि ते स्वत: त्या कथेचा शेवट बदलतात. या बदललेल्या शेवटात राजा त्या योद्धय़ाला एक संधी देण्याची घोषणा करतो आणि सर्व प्रजाजन आणि तो योद्धा खूश होतो आणि त्यांच्यावर गमबॉल्सचा वर्षाव होतो. स्कीटरला काही हा शेवट पटत नाही, पण मुलं त्याला सांगतात की कथेत काहीही घडू शकते.

दुसऱया दिवशी सकाळी स्कीटरला हॉटेलमधून फोन येतो की, हॉटेलच्या मालकाचा टीव्ही बिघडला आहे आणि त्याला तातडीने दुरुस्तीसाठी यावे लागेल. स्कीटर तातडीने तिथे पोहोचतो. टीव्ही दुरुस्त करत असताना तिथे उपस्थित असलेला मालक त्याला नव्या मॅनेजरच्या आधुनिक कल्पनांविषयी माहिती देतो. मात्र हॉटेल संदर्भात आधुनिक वाटणाऱया या कल्पना प्रत्यक्षात अत्यंत जुनाट आहेत हे त्याला स्कीटरशी चर्चा करताना लक्षात येते. स्कीटरवर खूश झालेला मालक त्याला हॉटेल चालवण्याची एक संधी द्यायला तयार होतो. आनंदाने गाणे गुणगुणत गाडी चालवत परत निघालेल्या स्कीटरची गाडी रस्त्यात अचानक बंद पडते. त्याक्षणी त्याच्यावर गमबॉल्सचा पाऊस पडायला लागतो आणि तो थक्क होतो. मुलांनी रचलेली कहाणी शब्दश प्रत्यक्षात उतरलेली असते.

दुसऱया रात्री पुन्हा स्कीटर कथा सांगायला घेतो. यात तो स्वत:ला एक काऊबॉय असल्याचे दाखवतो. ज्याच्याकडे एक लाल रंगाचा फरारी घोडा असतो. मात्र मुलांना ही कथा आवडत नाही आणि ते स्वत: एक कथा त्याला ऐकवतात. ज्यात तो एक काऊबॉय असतो आणि लाल रंगाच्या फरारी घोडय़ावर जात असताना तो एका सुप्रसिद्ध आणि सुंदर ललनेचा बचाव करतो आणि ती त्याच्या प्रेमात पडते. ही कथा ऐकल्यावर आता स्कीटरला लाल फरारी गाडी आणि सुंदर ललना मिळणारच याची खात्री वाटायला लागते. तसे त्याला ते मिळतेदेखील, पण कसे? आणि पुढच्या कथादेखील प्रत्यक्षात उतरतात का? हे सर्व या सुट्टय़ांमध्ये पडद्यावर अनुभवायला विसरू नका.