उद्योगविश्व – सर्जनशील

>> अश्विन बापट

रामोजी फिल्मसिटीमधलं मुव्ही मंजिक पार्क, बाबासाहेब पुरंदरेंची शिवसृष्टी, बनतारामधील सिंहांच्या वास्तव्याच्या जागेचं थीमिंग, नागपूरची गोरेवाडा सफारी, चंद्रपूरमधील आर्म फोर्सेसचं म्युझियम आणि बरंच काही… यावी मोठी आहे. या वास्तू साकारणारे हात मराठी आहेत, थीम पार्क डिझायनर संजय वाबके हे त्यांचं नाव !

रा मोजी फिल्मसिटीमधलं मुव्ही मंजिक पार्क, शिववृष्टी, वनतारामधील सिंहांच्या वास्तव्याच्या जागेचं श्रीनिंग, नागपूरची गोरेवाडा सफारी, चंद्रपूरमधील आर्म फोर्सेराचं म्युझियम आणि बरंच काही…. श्रीम पार्क डिझायनर संजय दाबके यांच्या कामाची यादी मोठी आहे अतिशय देगळ्या क्षेत्रात त्यांनी खणखणीत ठसा उमटवलाय. या वाटेवर पहिलं पाऊल कमी पडलं, अभी विचारलं असता ते म्हणाले, 1913-14 थे वर्ष होतं. मी अमेरिकेत एमएस करताना युनिवर्सल स्टुडिओ, डिस्ने लैंड पाहून मी थक्क झाली होती त्यातानी भव्यता, सौंदर्यस्थळं, त्यामागचा विचार हे सारं अचंबित करणारं होत आपल्या भारतातही असं काहीतरी स्तिमित करणारं साकारावं अशी खूणगाठ मी मनाशी बांबली. माझ्या ब्रॉडकास्टिंग इंजिनियरिंगच्या क्षेत्रात मी प्रत्येक वर्षागणिक नवनवीन गोष्टी शिकत होती. असे करताना 10 वर्षे लोटली. वर्ष होतं 2004. ई-टीकीमध्ये तत्कालीन सीईसी राजीव जालनापूरकर यांच्यामुळे मला रानोजी फिल्म सिटी साकारण्याची संधी मिळाली. माझ्यासाठी ती मोठा क्षण होता. ती माझी या क्षेत्रातली नांदी ठरली पुढे त्या कामानंतर शिर्डीतील साईतीर्थ 2004 ते 2008 या कालावधीत मी पूर्ण केलं. दरम्यानच्या काळात कही एक्झिबिशन्नाही केली. बंगलुरमधील जॉ लिवूड पार्क, नाशिकचं बॉटनिकल गार्डन, इमें जिका पावर्क्स यांचं आर्टवर्क आमच्या गार्डियन मीडिया अँड एन्टरटेन्मेंट कंपनीने केलंय. याशिवाय एक इनडोअर थीम पार्क, दिल्लीत छत्रपती शिवाजी महाराजांचा प्रवास मांडणारं एक म्युझियम मी साकारतोय. आतापर्यंत आम्ही देशात विविध 60 प्रोजेक्ट्स पूर्ण केलीत. तर, सात विविध थीम पाक्र्सवर काम सुरु आहे. बाबासाहेबांच्या संकल्पनेतील शिवसृष्टीचा तिसरा आणि चौथा टप्पा ज्याचंही काम आमची टीमच करणार आहे. आमची 50 जणांची मेन कोअर टीम आहे. याशिवाय 180 कलाकार त्या-त्या प्रोजेक्टनुसार, आम्ही प्रोजेक्टसाठी घेत असतो. अशी साधारण 230 चं मनुष्यय आमच्या गाठीशी आहे.

केवळ देशातच नव्हे तर परदेशातही आमच्या टीमच्या नावावर काही तगडी प्रोजेक्ट्स आहेत. डेन्मार्कचं यूटेनबर्ग पार्क, चेक रिपब्लिकची राजधानी प्रागमधलं देविन म्युझियम, फ्रान्सचं बोकाना गावो अशा पावर्सचं आर्टवर्कही जानच्या टीमचंच आहे हे सांगताना मला अभिमान वाटतो.

संकल्पनेचं गर्म, त्यासाठी बसणारी संहिता ही महत्त्वाची. तुम्ही जी कलाकृती साकारता ती बचप्प्रयाला खिळवून ठेवणारी असावी. भविष्यात रामायण, महाभारतासह आपल्या ऐतिहासिवा. पौराणिक परंपरा सांगणारी थीम पार्क्स निर्माण करणं हे माझं स्वप्न आहे, त्यांनी गप्पांची सांगता करताना सांगितलं.