दसरा मेळाव्याला अशी असेल वाहतूक व्यवस्था

शिवसेनेच्या दसरा मेळाव्यासाठी कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला असून वाहन व अन्य नियोजन तसेच सुरक्षेच्या दृष्टीने पोलिसांकडून महत्त्वाच्या सूचना करण्यात आल्या आहेत. त्याचे काटेकोरपणे पालन करून शिवसैनिक आणि शिवसेनाप्रेमींनी पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून करण्यात आले आहे.

पोलिसांच्या सूचना

z    शिवसेना पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी त्यांची वाहने सी. रामचंद्र चौक व वसंत देसाई चौक या ठिकाणी सोडून त्यानंतर सदरची वाहने शिवाजी पार्क येथील कामगार क्रीडा भवन, वनिता समाज, संयुक्त महाराष्ट्र दालन, वीर सावरकर स्मारक येथे पार्किंग करण्याकरिता घेऊन जावीत.

z    पश्चिम व उत्तर उपनगरातून येणाऱ्या मोठय़ा वाहनांतून (उदा. बसेस, टेम्पो इ.) कार्यकर्त्यांना माहीम, शोभा हॉटेल येथे डावे वळण देऊन सेनापती बापट मार्गावरून बाळ गोविंददास मार्ग जंक्शनपर्यंत नेऊन वाहने पार्क करून सभेसाठी जावे. जीप अथवा कार एल.जे. रोडने राजा बढे चौकापर्यंत न्यावी व तेथे कार्यकर्ते उतरल्यानंतर सदर वाहने जे.के. सावंत मार्गावरील कोहिनूर वाहनतळ येथे पार्किंगकरिता पाठवावीत.

z    पूर्व द्रुतगती महामार्गावरून येणारी मोठी वाहने (उदा. टेम्पो व बस इ.) दादर, खोदादाद सर्कल येथे उतरून फाइव्ह गार्डन, माटुंगा येथे पार्किंगकरिता पाठवावीत.

z    दक्षिण मुंबईतून येणारी वाहने (उदा. टेम्पो व बस इ.) ही डॉ. अॅनी बेझंट मार्गे स्वा. सावरकर मार्गावरून सूर्यवंशी क्षत्रीय सभागृह मार्गापर्यंत येतील व तेथे कार्यकर्ते उतरल्यानंतर ती सयानी रोडने सेनापती बापट मार्गावर पार्किंग करतील.

जेवणाचे डबे, बॅगा आणू नका

दसरा मेळाव्याकरिता येणाऱ्या शिवसेनाप्रेमी जनतेने व शिवसैनिकांनी जेवणाचे डबे, बॅगा अथवा अन्य वस्तू घेऊन येऊ नये, असे निर्देश पोलीस अधिकाऱ्यांनी सुरक्षा व्यवस्थेच्या कारणास्तव दिले आहेत. या निर्देशांचे पालन तंतोतंत करावे. तसेच शिवाजी पार्क मैदानात प्रवेशद्वारातून प्रवेश करताना पोलीस सुरक्षा तपासणी अधिकाऱ्यांना सहकार्य करावे.

आसन आणि वाहन व्यवस्था पुढीलप्रमाणे असेल…

z वीर सावरकर मार्गावरून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, शिवसेना नेते युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे आणि शिवसेनेच्या अन्य नेत्यांचे आमगन होईल. त्यामुळे इतर शिवसेनाप्रेमी जनतेने व शिवसैनिकांनी या मार्गावर वाहने घेऊन येऊ नयेत.

z शिवसेना उपनेते, खासदार, आमदार, जिल्हाप्रमुख, विभागप्रमुख, निमंत्रित यांच्या आसन व्यवस्थेकरिता कालिकामाता मंदिराच्या शेजारून तसेच स्काऊट पॅव्हेलियनच्या बाजूने प्रवेश देण्यात येईल. या परिसरात आसन संख्या मर्यादित असल्याने निमंत्रण पत्रिकेशिवाय कोणालाही प्रवेश देण्यात येणार नाही.

z  शिवसेना नेते व व्यासपीठावरील मान्यवरांकरिता वीर सावरकर मार्गावरील उद्यान गणेश मंदिरापुढील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या शेजारून प्रवेश व्यवस्था करण्यात आली आहे.

z इलेक्ट्रॉनिक मीडियाचे कॅमेरामन व वृत्तपत्र प्रतिनिधी यांना समर्थ व्यायाम मंदिराकडून प्रवेश देण्यात येईल. त्यांनी आपले ओळखपत्र दाखवून प्रवेश करावा व पोलिसांना सहकार्य करावे. त्याचप्रमाणे इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या ‘ओबी व्हॅन’ समर्थ व्यायाम मंदिर परिसरातच उभ्या कराव्यात.

z शिवसैनिक व इतर मान्यवरांना शिवतीर्थ येथे येण्यास सोयीचे व्हावे याकरिता स्थानिक पोलीस व वाहतूक यंत्रणा नियंत्रित करणाऱ्या पोलिसांना वाहतुकीचे आणि गर्दीचे योग्य नियंत्रण करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहनही करण्यात आले आहे.

– पार्किंग –

वाहने उभी करण्याची व्यवस्था पुढीलप्रमाणे

बसेस, टेम्पो ट्रव्हलर,  मोठे टेम्पो

z संपूर्ण सेनापती बापट मार्ग, दादर

z कामगार मैदान, सेनापती बापट मार्ग, दादर

z माहीम कॉजवे ते माहीम जंक्शन

z पाच गार्डन, माटुंगा

z एडनवाला रोड, माटुंगा

z नाथालाल पारेख, माटुंगा

z आर. ए. के. रोड, वडाळा

चारचाकी हलकी वाहने

z इंडिया बुल इंटरनॅशनल सेंटर, सेनापती बापट मार्ग, दादर

z इंडिया बुल्स 1 सेंटर, ज्युपिटर मिल पंपाऊंड,

z एल्फिन्स्टन, सेनापती बापट मार्ग

z कोहिनूर पार्क, शिवाजी पार्क