मध्य पुर्वेत इस्रायल आणि इराणमधला संघर्ष पेटला आहे. पण या संघर्षामुळे हिंदुस्थानची चिंता वाढली आहे. गेल्या काही दिवसांत इस्रायलकडून झालेल्या गोळीबारात संयुक्त राष्ट्र संघाच्या शांती सैनिक जखमी झाले होते. या शांती सेनेत हिंदुस्थानचे 600 सैनिक आहेत. हे सैनिक लेबनानमध्ये संयुक्त राष्ट्र संघाच्या शांती मिशनचे काम करत आहेत. हे सैनिक इस्रायल लेबनानच्या 120 किमी लांबीच्या ब्ल्यू लाईनवर तैनैत आहेत. लेबनान आणि इस्रायलमध्ये संघर्ष वाढत असून हिंदुस्थानला या सैनिकांचा चिंता आहे.
हिंदुस्थानच्या परराष्ट्र मंत्रालयाने यावर चिंता व्यक्त केली आहे. संयुक्त राष्ट्र संघाच्या परिसराचा सर्वांनी सन्मान ठेवला पाहिजे आणि संयुक्त राष्ट्र संघाच्या शांती सैनिकांच्या सुरक्षेसाठी सर्वांनी प्रयत्न केले पाहिजे असे परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे.
इस्रायलने लेबनानवर केलेल्या हल्ल्यात शांती सेनेचे दोन सैनिक जखमी झाले. त्यांना तत्काळ रुग्णालयात दाखल केले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या हल्ल्यात सैनिक गंभीर जखमी नसल्याने काळजी करण्याचे काही कारण नाही असेही पराराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे.
मध्य पुर्वेत लेबनाना आणि हिजबुल्लाह विरोधात इस्रायलचा संघर्ष सुरू आहे. या परिस्थितीत दक्षिण लेबननच्या सीमेवर शांती प्रस्थापित करण्यासाठी संयुक्त राष्ट्रसंघाची UNIFIL (United Nations Interim Force in Lebanon) ची एक तुकडी तैनात आहे. पण या संघर्षात शांतीसेनेचे दोन सैनिक जखमी झाले होते.