चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर शहरातील श्रीराम वॉर्डातील एका घरातून पोलिसांनी शस्त्रसाठा जप्त केला. यात सहा तलवारी, एक भाला व एक कुकरी यांचा समावेश आहे. हे शस्त्र नेमके कशासाठी वापरले जाणार होते, ते कुठून आणले, याचा शोध पोलिस घेत आहेत. मात्र नागरी वस्तीत हे शस्त्र सापडल्याने नागरिकात भीतीचे वातावरण आहे. याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. प्रमोद श्रीहरी बरडे, आकाश ऊर्फ पिंटू बरडे अशी या आरोपींची नावे आहेत. यापूर्वी पोलिसांनी 13 तलवारी जप्त केल्या होत्या. मागील दोन महिन्यात जिल्ह्यात गुन्हेगारी स्वरूपाच्या घटना मोठ्या प्रमाणात समोर आल्याने पोलिसांवर मोठा दबाव निर्माण झाला आहे. दरम्यान, या घटनेमुळे पोलिसांनी शस्त्र शोध मोहीम आणखी गतिमान केली.