बॉलीवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांचा उद्या, शुक्रवारी 82वा वाढदिवस. बिग बी यांचा वाढदिवस म्हणजे त्यांच्या जगभरातील असंख्य चाहत्यांसाठी एखादा उत्सवच असतो. सकाळपासूनच त्यांच्या आलिशान बंगल्याबाहेर हातात फुलांचे गुच्छ आणि पोस्टर घेऊन चाहते शुभेच्छा देण्यासाठी गर्दी करतात. छोटय़ा पडद्यावरील लोकप्रिय रियालिटी शो ‘काौन बनेगा करोडपती’च्या सेटवरदेखील या ‘महानायकाचा जन्मोत्सव’ धूमधडाक्यात साजरा करण्यात आला.
‘महानायकाचा जन्मोत्सव’ या ‘कौन बनेगा’च्या विशेष भागात अमिताभ बच्चन यांना वाढदिवसाचे सरप्राईज देण्यासाठी आमीर खान त्याचा मुलगा जुनैद खानसोबत सहभागी झाला. ‘जेव्हा मी लहान होतो तेव्हा तुम्ही सुपरस्टार होतात. आता मी म्हातारा झालोय तरी तुम्हीच सुपरस्टार आहात,’ असे म्हणत आमीर खान या महानायकाला मानाचा मुजरा केला.