धारावीकरांचे बोरिवली, मालवणीत पुनर्वसन; मिंधे सरकारचे मंत्रिमंडळ बैठकीत शिक्कामोर्तब

धारावी पुनर्विकास प्रकल्पात अपात्र ठरणाऱ्या नागरिकांचे मिंधे सरकार बोरिवली आणि मालाडच्या मालवणीत पुनर्वसन करणार आहे. मिंधे सरकारने तसा निर्णय आज मंत्रिमंडळ बैठकीत घेतला. धारावी पुनर्विकास प्रकल्पात अपात्र ठरणाऱया नागरिकांना बोरिवलीतील मौजे आक्से आणि मालवणी येथे शासकीय जागा दिली जाणार आहे.

रहिवाशांचा विरोध झुगारून मिंधे सरकारने धारावीतील लाखो रहिवाशांना अपात्र ठरवण्याचा घाट घातला असून आजच्या निर्णयानुसार सुमारे 140 एकर क्षेत्रापैकी वाटपासाठी उपलब्ध होणारे क्षेत्र धारावी पुनर्विकास प्रकल्पांतर्गत झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या विशेष हेतू पंपनीकडून घरे बांधण्याकरिता या जमिनीची प्रचलित बाजार मूल्याप्रमाणे शंभर टक्के
किंमत वसूल करून ती डीआरपी आणि एसआरएला देण्यात येणार आहे.

– अपात्र झोपडीधारकांची गणना निश्चित होईल त्याप्रमाणे धारावी पुनर्विकास प्राधिकरणाने मुंबई उपनगर जिल्हाधिकाऱयांकडे आवश्यक जमिनीची मागणी करावी असे शासनाच्या निर्णयात म्हटले आहे.