उद्योगमहर्षीला अखेरचा निरोप…

रतन टाटा म्हणजे  विश्वास आणि सचोटीचे दुसरे नाव. देशाच्या उद्योगजगताचा महामेरू. सामाजिक जाणिवेतून यशाचा राजमार्ग घडवणारे महान उद्योजक. त्यांच्या निधनाने अवघा देश हळहळला. घरातील कुणी वडीलधारी हरपल्याची भावना तमाम देशवासीयांची होती.  सर्वसामान्य नागरिकांपासून सेलिब्रेटीपर्यंत साऱ्यांनी उद्योगमहर्षीला भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली.

Displaying 20241010_205804.jpg

एनसीपीए येथे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेयांनी रतन टाटा यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेऊन श्रद्धांजली वाहिली. रश्मी ठाकरे, शिवसेना नेते आदित्य ठाकरेयांनीही टाटा यांना श्रद्धांजली वाहिली.

Displaying F82A1187.jpg

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी एनसीपीए येथे रतन टाटा यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेऊन श्रद्धांजली वाहिली.

आजीने दिलेल्या शिकवणुकीमुळे आयुष्य बदलले

Displaying navajbai_tata.jpg

आई-वडिलांच्या घटस्फोटानंतर पुरता खचून गेलो. शाळा-महाविद्यालयातील रॅगिंग आणि अनेक अशा गोष्टींचा त्यांना सामना करावा लागला. पण, आजी नवजबाई टाटा यांनी सांभाळले आणि तिने आमचे उत्तम संगोपन केले. आईचे दुसरे लग्न झाले तेव्हा शाळेतील मुले आमच्याबद्दल उलटसुलट बोलयची. परंतु, आजीने आम्हाला मर्यादेचे उल्लंघन करू नका, अशी शिकवण दिली. या शिकवणुकीमुळे आयुष्य बदलले आणि आजीची शिकवण आतापर्यंत आमच्यासोबत आहे, असा किस्सा रतन टाटा यांनी आपल्या मुलाखतीत सांगितला होता.

मान्यवरांनी घेतले अंत्यदर्शन

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू, गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल, खासदार सुप्रिया सुळे, शिवसेना नेते-खासदार अनिल देसाई, केंद्रीय मंत्री पियूष गोयल, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, उद्योगपती मुकेश अंबानी, नीता अंबानी, आनंद पिरामल, ईशा अंबानी-पिरामल, अभिनेते आमीर खान, किरण राव, मधुर भांडारकर, माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर, रवी शास्त्री आदी मान्यवरांनी रतन टाटांचे अखेरचे दर्शन घेऊन त्यांना श्रद्धांजली वाहिली.

भारतरत्न देण्याची राज्याची विनंती

रतन टाटा यांना राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. रतन टाटा यांचे उद्योग विश्वातील योगदान लक्षात घेऊन त्यांना भारतरत्न पुरस्कार देण्याची केंद्राला विनंती करणारा प्रस्तावही संमत करण्यात आला.

एक दिवसाचा शासकीय दुखवटा

रतन टाटा यांच्या निधनामुळे महाराष्ट्र आणि झारखंड सरकारने एक दिवसाचा शासकीय दुखवटा जाहीर केला. त्यामुळे गुरुवारचे सर्व शासकीय कार्यक्रम रद्द करण्यात आले. या काळात राज्यातील शासकीय कार्यालयांवरील राष्ट्रध्वज अर्ध्यावर उतरविण्यात आला.

n   टाटा कुटुंबाने निवेदनाद्वारे सर्वांचे आभार मानले. ‘आम्ही त्यांचे भाऊ, बहीण व कुटुंबीय, सर्व लोकांकडून मिळालेल्या प्रेम व सन्मानाने भारावून गेलो आहे. आता रतन टाटा आपल्यामध्ये राहिले नाहीत. मात्र त्यांची विनम्रता, उदारता आणि विचारांचा वारसा भावी पिढय़ांना प्रेरणा देत राहील,’ असे टाटा कुटुंबाने म्हटले. आम्ही एक मित्र व मार्गदर्शक गमावला, अशी भावना टाटा सन्सचे चेअरमन एन. चंद्रशेखरन यांनी व्यक्त केली.

n   उद्योगक्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल  उद्योजकांना देण्यात येणाऱ्या उद्योगरत्न पुरस्काराचे नामकरण रतन टाटा उद्योगरत्न पुरस्कार असे करण्याचा निर्णय राज्य सरकारच्या वतीने आज घेण्यात आला आहे.

गुडबाय, माय डियर लाइटहाऊस

Displaying shantanu_naidu-Deepak.jpg

रतन टाटा यांचे अत्यंत जवळचे तरुण मित्र शांतनू नायडू यांनी ‘एक्स’वरून भावनिक पोस्ट लिहीत श्रद्धांजली अर्पण केली. ही मैत्री तुटल्यामुळे निर्माण झालेली पोकळी भरून काढण्याचा मी आयुष्यभर प्रयत्न करेन. प्रेमासाङ्गी दुŠखाची पिंमत मोजावी लागते.  गुडबाय, माय डियर लाइटहाऊस… अशा भावना शांतनू नायडू यांनी व्यक्त केल्या आहेत. नायडू यांनी रात्रीच्या अंधारात भटकी कुत्री वाहनांखाली येऊ नयेत यासाङ्गी रिफ्लेक्टिव कॉलर विकसित केले होते. त्यांच्या या पुढाकारामुळे प्रभावित झालेल्या टाटांनी नायडू यांना आपल्यासाङ्गी काम करण्याचे निमंत्रण दिले. विशेष म्हणजे गेल्या 10 वर्षांत शांतनू नायडू रतन टाटा यांचे अत्यंत जवळचे आणि विश्वासू मित्र बनले होते.

लाडक्या ‘गोवा’नेही वाहिली श्रद्धांजली

Displaying goa.jpg

रतन टाटा यांचा खास आणि लाडका श्वान ‘गोवा’नेही त्यांना श्रद्धांजली वाहिली. ‘गोवा’ हा श्वान रतन टाटा यांच्या अगदी हृदयाजवळ होता. टाटांना तो काही वर्षांपूर्वी गोव्यात सापडला. टाटांनी त्याला मुंबईत आणले आणि त्याचे नाव ‘गोवा’ ङ्खेवले.