मुंबई ठाण्यात आज वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने हजेरी लावली. पण पुढील चार ते पाच दिवस मुंबई, ठाणे आणि पुण्यासह इतर जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडेल असा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
पुणे हवामाना विभाग प्रमुख के एस होसाळीकर यांनी एक्सवर पोस्ट करून म्हटलं आहे की, अरबी समुद्रात तयार झालेली कमी दाबाची प्रणाली पुढील 2,3 दिवसांत आणखी तीव्र होऊन वायव्येकडे सरकण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढील चार ते पाच दिवस महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना मेघगर्जने,विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्याचा इशारा आहे.
उद्या मुंबई, ठाणे, पालघर, कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवड्यात धाराशिव आणि लातूर वगळता तसेच पूर्व विदर्भाला विजेच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
शनिवारी कोकण, पुणे, सातारा, कोल्हापूर, नगर, संभाजीनगर, जालना आणि बीड जिल्ह्याला मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
10 Oct:अरबी समुद्रात तयार झालेली कमी दाबाची प्रणाली पुढील 2,3 दिवसांत आणखी तीव्र होऊन वायव्येकडे सरकण्याची शक्यता. महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना मेघगर्जने,विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्याचा इशाराआहे. (for next 4,5 days)
काही जिल्ह्यांत मुसळधार पावसाचा इशारा
IMD@SDMAMaharashtra pic.twitter.com/VAFMf4L9Nw— K S Hosalikar (@Hosalikar_KS) October 10, 2024