बिहार सरकारने सरकारी शाळेतल्या शिक्षकांसाठी नवा फर्मान काढला आहे. या शिक्षकांसाठी जीन्स टिशर्ट शर्टवर बंदी घालत ड्रेसकोड लागू केला आहे. शिवाय सरकारी आदेशानुसार शिक्षक यापुढे औपचारीक कपड्यांमध्येच शाळेत येतील. आदेशाचे पालन न केल्यास त्यांच्यावर कडक कारवाई होईल असे म्हंटले आहे.
बिहार सरकारच्या या आदेशात स्पष्टपणे सांगण्यात आले आहे की, टी-शर्ट आणि जीन्ससारखे कॅज्युअल कपडे घालून ड्रेस कोडचे उल्लंघन करणाऱ्या शिक्षकांवर कठोर कारवाई केली जाईल. याआधीही सरकारकडून ड्रेस कोडबाबत मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्यात आली होती, मात्र आता सरकारने या ड्रेस कोडची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याच्या योजनेवर काम सुरू केले आहे.
सरकारी शाळांमध्ये ड्रेस कोड लागू केल्याने शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले की, शिक्षकांसाठी ड्रेसकोड लागू करण्यामागची महत्वाचे कारण सोशल मीडिया आहे. कारण दरदिवशी व्हायरल व्हिडीओमध्ये, ज्यामध्ये शिक्षक डान्स करताना दिसत आहेत. सोशल मीडियावर व्हायरल होणारा शिक्षकांच्या डान्सचा व्हिडीओबाबत शिक्षण विभागाच्या म्हणण्यानुसार, या प्रकारच्या कृत्याने केवळ शाळा, शैक्षणिक माहोलवर प्रभाव पडत नाही तर शाळेची प्रतिमेवर परिणाम होतो.
ड्रेस कोडबाबत जारी करण्यात आलेल्या नोटीसमध्ये म्हटले आहे की, शाळा-शैक्षणिक संस्थांमध्ये नियुक्त केलेले शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी कार्यालयीन वेळेत औपचारिक पोशाखात येतील असे निर्देश दिले आहेत. त्याचे पालन सुनिश्चित केले पाहिजे. ”