एका 35 वर्षीय शाळेच्या शिक्षकाने तब्बल 42 लहान विद्यार्थिनींचा लैंगिक छळ केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी बी. मुथुकुमारन याला अटक केली आहे. तमिळनाडूमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे.
12 ऑगस्ट 2024 रोजी ही घटना उघडकीस आली. जेव्हा नववी आणि दहावीत शिकणाऱ्या काही पीडित मुलींच्या पालकांनी चाईल्ड हेल्पलाईनवर तक्रार केली. तेव्हा चाईल्ड हेल्पलाईनने 13 ऑगस्टला शाळेत चौकशी केली. तेव्हा अनेक मुलींनी मुथुकुमारनने लैंगिक छळ केल्याचे म्हटले.
चाईल्ड हेल्पलाईनने यावर सविस्तर चौकशी करून मुख्य शिक्षणाधिकाऱ्यांकडे अहवाल सादर केला. तेव्हा प्रशासनाने मुथुकुमारनला तत्काळ निलंबीत केले. पण त्याच्यावर कुठलीही कायदेशीर कारवाई झाली नाही. त्यानंतर चाईल्ड हेल्पलाईनने तक्रार दाखल केली. तेव्हा पोलिसांनी पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला. तेव्हा मुथुकुमारनला अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.