राज्यातील आश्रमशाळांच्या दयनीय अवस्थेवरून उच्च न्यायालयाने बुधवारी मिंधे सरकारचे कान उपटले. आश्रमशाळांतील 80 मुलांच्या मृत्यूला जबाबदार कोण? एकदा आश्रमशाळांना भेट द्या आणि तेथील मुलांची व्यथा पहा. उपाययोजना केवळ कागदावर ठेवू नका, असे न्यायालयाने सरकारला सुनावले. आश्रमशाळांमध्ये सोयीसुविधा नसल्यामुळे मुलांची प्रचंड गैरसोय होत आहे. याकडे लक्ष वेधत रवींद्र तळपे यांनी दाखल केलेल्या जनहित याचिकेवर मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली.