मिंधे सरकारची उधळपट्टी, मंत्रिमंडळ निर्णयाचे एसएमएस नागरिकांना पाठवण्यासाठी 23 कोटींची तरतूद

राज्यातील मिंधे भाजप सरकारने पाच दिवसांच्या सोशल मीडियावरील प्रसिद्धीसाठी तब्बल 90 कोटी रुपयांचे टेंडर काढले असतानाच आता आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. मंत्रिमंडळाच्या साप्ताहिक बैठकीत घेतले जाणारे निर्णय नागरिकांपर्यंत एसएमएसद्वारे पाठवण्यासाठी 23 कोटींची उधळपट्टी हे सरकार करत आहे. या कामासाठी टेंडर मागवले जाणार आहेत.

माहिती व जनसंपर्क संचालनालयाकडून ही टेंडर प्रक्रिया राबवली जाणार आहे. त्यासाठी 23 कोटी 78 लाख 88 हजार रुपये इतक्या खर्चाला आज मिंधे सरकारने मान्यता दिली. ई-निविदा प्रक्रिया राबवून कोणत्या कंपनीला हे काम द्यायचे त्याचा निर्णय माहिती व जनसंपर्क संचालनालय घेणार आहे.