फ्रान्स बनावटीची राफेल लढाऊ विमाने आपल्या ताफ्यात असावीत असे हिंदुस्थानी नौदलाला वाटत आहे. तशी बोलणी डसॉल्ट एव्हिएशन या फ्रान्स कंपनीसोबत सुरू आहेत. त्यामुळे येत्या काळात राफेलचे मरीन व्हर्जन नौदलाच्या ताफ्यात आल्यास आश्चर्य वाटायला नको. यादृष्टीने सरकार आणि नौदलामध्ये किमतीवरून चर्चा सुरू आहे. सरकारला 114 राफेल विमाने खरेदी करायची आहेत. फ्रेंच कंपनीसोबत ही डील कशी यशस्वी होतेय, हे येत्या काळात समजेल.
राफेलची किंमत 2016मध्ये निश्चित करण्यात आली. महागाईच्या तुलनेत आता त्यांची किंमत वाढू शकते. त्यामुळे नौदलला ज्यादा किमतीत राफेल खरेदी करावे लागतील. खरंतर सुरुवातीला सरकारने 126 लढाऊ विमानांची योजना आखली होती. त्यानंतर त्यात बदल करत 36 राफेल विमानांची डील ठरवली. त्या वेळी त्यांची किंमत 59 हजार कोटी रुपये एवढी होती.