हरयाणा विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा पराभव झाला आहे. हरयाणा निवडणुकीत ईव्हीएम हॅक झाल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. निवडणूक आयोगाने याचा तपास करावा अशी मागणी काँग्रेसने केली आहे.
हरयाणा निवडणुकीत काँग्रेस पक्षाला 37 जागा मिळाल्या असून भाजपला 48 जागा मिळाल्या आहेत. पण यात ईव्हीएएम हॅक झाल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. पवन खेरा, केसी वेणुगोपाल, अशोक गहलोत, अजय माकन आणि भुपेंद्र सिंह हुड्डा यांनी निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली. पवन खेरा म्हणाले की, 20 जागांवर ईव्हीएम हॅक झाले होते. त्यापैकी 7 जागांचे पुरावे आम्ही निवडणूक आयोगाकडे सुपूर्द केले आहेत. इतर 13 जागांवरचे पुरावे आम्ही पुढच्या 48 तासांत सादर करू असे खेडा म्हणाले.
आज @kcvenugopalmp जी, @ashokgehlot51 जी, @ajaymaken जी, @BhupinderShooda जी, @Jairam_Ramesh जी, @INCUdaiBhan जी और @DrAMSinghvi जी चुनाव आयोग से मीटिंग में मौजूद रहे।
चुनाव आयोग को हमने अपनी 20 शिकायतों के बारे में जानकारी दी है। इनमें 7 शिकायतें हमारे पास लिखित में मौजूद हैं।… pic.twitter.com/uPrldmTG07
— Congress (@INCIndia) October 9, 2024
जोपर्यंत संपूर्ण चौकशी होत नाही तोपर्यंत सर्व मशीन्स सील केल्या जाव्यात अशी मागणी काँग्रेसने केली आहे. तसेच कर्नाल, रेवारी, पानीपत शहर, होडाल, कालका, नारनौल आणि दबवाली या मतदारसंघातले पुरावे सादर केल्याचे खेडा यांनी सांगितले.
काँग्रेस जिंकेल असे चित्र असताना काँग्रेसचा पराभव झाला हे धक्कादायक आहे अशी प्रतिक्रिया माजी मुख्यमंत्री भुपिंदर सिंह हुड्डा यांनी दिली आहे.