उत्तराखंडमध्ये किळसवाणा प्रकार उघड, चहाच्या भांड्यात थुंकतानाचा व्हिडिओ व्हायरल

उत्तराखंडमध्ये एक किळसवाणा प्रकार उघडकीस आला आहे. चहा बनवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या भांड्यात एक व्यक्ती थुंकत असल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. मसुरीमधील हा व्हिडिओ असून याप्रकरणी स्थानिक पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. डेहराडूनचे रहिवासी हिमांशू बिश्नोई हे 29 सप्टेंबर रोजी मसुरीला गेले असता ही घटना घडली. सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास मसुरीतील एका रोडसाईड स्टॉलवरून चहा घेतला. यावेळी बिश्नोई हे तेथील दरीचा व्हिडीओ मोबाईलमध्ये रेकॉर्ड करत असताना त्यांना चहावाला चहा बनवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या सॉसपॅनमध्ये थुंकताना दिसला.

याबाबत चहावाल्याला जाब विचारला असता त्याने धमकी दिल्याचा दावाही बिश्नोई यांनी केला आहे. यानंतर बिश्नोई यांनी स्थानिक पोलिसात तक्रार दाखल केली. तसेच पुरावा म्हणून रेकॉर्ड केलेला व्हिडिओ देखील पोलिसांना दिला.

आरोपींची ओळख पटली असून नौशाद अली आणि हसन अली अशी या दोघा भावांची नावे आहे. आरोपी मूळचे उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगर येथील रहिवासी आहेत. स्थानिक पोलीस ठाण्याचे अधिकारी अरविंद चौधरी यांनी व्हिडिओच्या सत्यतेची पुष्टी केली असून पुढील तपास सुरू आहे.