मुंबईत रिमझिम पावसाची हजेरी, उकाड्याने हैराण झालेल्या मुंबईकरांना दिलासा

फोटो - रुपेश जाधव

मुंबईत आज रिमझिम पावसाने हजेरी लावली. त्यामुळे उकाड्याने हैराण झालेल्या मुंबईकराना थोडा दिलासा मिळाला आहे. काही दिवसांपूर्वी मुंबईत मुसळधार पाऊस पडला होता. त्यामुळे ठिकठिकाणी पाणी साचले होते तर लोकलही ठप्प झाली होती. त्यानंतर मुंबईत पावसाने ओढ दिली आणि ऑक्टोबर हिटने मुंबईकरांना चांगलाच घाम काढला.

आता मुंबईसह ठाणे,रायगड भागात पावसाने हजेरी लावली आहे. हवामान विभागाने नवी मुंबई, कुलाबा आणि ठाणे भागाला ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. रायगड आणि अलिबागला रेड अलर्ट जारी केला आहे. इतर भागात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस पडेल असा इशारा देण्यात आला आहे.