हरयाणाच्या निकालानंतर काँग्रेसला एकाच दिवशी दोन धक्के, दिल्लीत ‘आप’चा स्वबळाचा नारा, तर…

जम्मू-कश्मीर आणि हरयाणा विधानसभा निवडणुकीचे निकाल लागले असून काँग्रेसला अपेक्षित यश मिळाले नाही. हरयाणामध्ये काँग्रेसचे सरकार येता येता राहिले, तर जम्मू-कश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फरन्ससोबत काँग्रेसचे सरकार सत्तेत दिसणार असले तरी 2014 च्या तुलनेत काँग्रेसच्या जागा निम्म्यावर आल्या आहेत. येथे काँग्रेस 6 जागाच जिंकू शकला. अशातच काँग्रेसला आणखी दोन धक्के बसले आहेत.

आदमी पार्टीने दिल्लीतील विधानसभा निवडणूक स्वबळावर लढणार असून कोणत्याही पक्षाशी युती करणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. तर दुसरीकडे समाजवादी पार्टीने उत्तर प्रदेशमध्ये होणाऱ्या पोटनिवडणुकीमध्ये काँग्रेसने दावा केलेल्या जागांवर उमेदवार जाहीर केले आहेत. त्यामुळे काँग्रेसला धक्का बसला आहे.

हरयाणातील निकालाचा महाराष्ट्रावर कोणताही परिणाम होणार नाही, तिथल्या चुका इथे दुरुस्त होतील! – संजय राऊत

हरयाणा विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा पराभव झाल्यानंतर आपच्या राष्ट्रीय प्रवक्त्या प्रियंका कक्कड यांनी आम आदमी पार्टी दिल्लीतील विधानसभा निवडणूक स्वबळावर लढणार असल्याची घोषणा केली. एकीकडे अतिआत्मविश्वासी काँग्रेस, तर दुसरीकडे अहंकारी भाजप आहे. आम्ही गेल्या 10 वर्षात दिल्लीत जी काही कामं केली त्याच्या बळावर आम्ही निवडणुकीच्या मैदानात उतरू, असे त्या म्हणाल्या.

भाजपचा स्वबळाचा नारा, हरयाणाचा निकाल अन् मित्रपक्षांचं भविष्य; रोहित पवारांचा मिंधे-अजितदादांना सूचक इशारा

विशेष म्हणजे हरयाणा विधानसभा निवडणुकीआधी काँग्रेस आणि आपची युती होईल अशी शक्यता होती. मात्र ऐनवेळी सगळे फिस्कटले आणि दोन्ही पक्ष वेगवेगळे लढले. त्यामुळे मतविभागणी होऊन भाजपचा फायदा झाला.

सपानेही दिला झटका

दुसरीकडे समाजवादी पार्टीने पोटनिवडणुकीसाठी उमेदवारांची घोषणा केली आहे. सपाने पहिली यादी जाहीर केली असून 6 उमेदवारांची नावे आहे. करहल विधानसभा मतदारसंघातून तेज प्रताप यादव, मिल्कीपूरमधून अजित प्रसाद, सीसामऊमधून नसीम सोलंकी, फुलपूरमधून मुस्तफा सिद्दकी, मझंवामधून डॉ. ज्योती बिंद आणि कटेहरीमधून शोभावती वर्माला तिकीट देण्यात आले आहे. यातील काही जागांवर काँग्रेसनेही दावा होता. मात्र चर्चा सुरू असतानाच सपाने उमेदवार जाहीर करत काँग्रेसला धक्का दिला.

नूंह दंगलीतील आरोपीचा सर्वाधिक मताधिक्क्यानं विजय, तर ‘या’ उमेदवारानं अवघ्या 32 मतांनी मारली बाजी!